गुटखा साठवणूकीमुळे तीन आरोपींवर गुन्हा
पिंपरी, ता. २९ : गुटखा आणि तंबाखूची बेकायदारित्या साठवणूक व वाहतूक केल्याबद्दल पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. ताथवडे, वाकड व निगडी येथे या कारवाया करण्यात आल्या. ताथवडेतील भूमकर चौकातील आयुष स्नॅक्स सेंटर येथे वाकड पोलिसांनी श्रीमंत ग्यानोबा शिंदे (रा. ताथवडे) याला अटक केली. या कारवाईत ३ हजार ६६२ रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. भूमकर वस्तीतील कस्तुरी चौक परिसरातील महिंद्रा पान शॉपमध्ये बेकायदारित्या साठवून ठेवलेला ५ हजार ३९८ रुपये किमतीचा सुगंधी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत हिंजवडी पोलिसांनी अमन रिखई कुमार (रा. सुंदर कॉलनी, काळेवाडी फाटा) याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने निगडीत मोहम्मद रशीदखान (रा. घरकुल, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला. तो दुचाकीवरून ६ हजार ३२० रुपये किमतीचा गुटखा घेऊन जात होता.
----------------------------------------------------------

