नववर्ष स्वागत निवांत ठिकाणी करण्याकडे कल
पिंपरी, ता. ३० : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गजबजलेल्या पर्यटनस्थळांपासून दूर आणि एकांतामध्ये आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. यामुळे अगदी होम स्टे, बंगले आणि रिसॉर्ट सध्या हाऊसफुल्ल झालेले आहेत.
डिसेंबरच्या शेवटी बहुतांश शाळांना नाताळाच्या सुट्या सुरू होतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही ही वर्षाखेर असते त्यामुळे या काळात बहुतांश नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे कोकण, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा या ठिकाणी सुटी घालविण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. राज्यभरातून पर्यटक येत असल्याने या सर्वच पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी पहायला मिळते. त्यामुळे शहरापासून जवळच मात्र एकांतामध्ये असलेल्या रिसॉर्ट, फार्म हाऊस व होम स्टे पर्याय नागरिक निवडत आहेत.
दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले
शहराजवळील मुळशी, कासारसाई, पवना, भामा आसखेड ही धरणांच्या परिसरात तसेच मावळ. आंदर मावळ, तिकोना, कामशेत, तळेगाव या भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रिसॉर्टची संख्या वाढली आहे. तसेच मोठ्या ग्रुपसाठी बंगले देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतरवेळी पेक्षा सुटीच्या काळात या रिसॉर्टस् व फार्म हाउसच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. एरव्ही प्रतिव्यक्ती १५०० ते २०० जिथे मोजावे लागतात तिथे नवीन वर्षानिमित्त दर २५०० ते ३०० हजार प्रतिव्यक्तीपर्यंत जाऊन पोचला आहे. काही मोठ्या रिसॉर्टमध्ये तर एक रात्र राहणे व जेवणासाठी एका कुटुंबाला किमान १५ ते २० हजारही मोजावे लागत आहेत.
विविध सुविधा
नव्याने सुरू करण्यात आलेल्या बहुतांश रिसॉर्ट व फार्म हाउसवर पर्यटकांसाठी राहणे व जेवणासोबतच स्विमिंग पूल, बोन फायर यासोबतच विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात येतात. फार्म हाउसवर केअर टेकरचीही नेमणूक केलेली असते. त्यामुळे पर्यटनस्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ, सुटीच्या दिवसांत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी व गर्दी, हॉटेल चालकांकडून मिळणारी अपुरी सेवा यामुळे यावर्षी नागरिकांचा कल निवांत ठिकाणी जाऊन आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्याकडे वाढला आहे.
PNE25V81107
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

