वाहन खरेदीत १३.७३ टक्के वाढ

वाहन खरेदीत १३.७३ टक्के वाढ

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात सरत्या वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान तब्बल दोन लाख १७ हजार ९२० वाहनांची नोंदणी झाली. २०२४ मध्ये हा आकडा एक लाख ९१ हजार ६०२ इतका होती. गतवर्षीच्या तुलनेत १३.७३ टक्के वाढ झाली. दुचाकी खरेदीतही यंदा १२.९६ टक्के वाढ झाली आहे.
ऑटोमोबाइल उद्योगात सकारात्मक वातावरण असून वाहन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकही वाहन खरेदी करताना वाहनांच्या ‘लूक’सह ‘फीचर्स’ला जास्त महत्त्व देत आहेत. नवनवीन ‘फीचर्स’ असलेल्या वाहनांना ग्राहक पसंती देत आहेत. बाजारात विविध कंपन्यांच्या प्रीमियम कारला मोठी मागणी आहे. काही कारसाठी नागरिकांना दोन-तीन महिने प्रतिक्षा करवी लागत आहे.
बाजारात पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक वाहने देखील दाखल होत आहेत. शासनाने पर्यावरणपुरक इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्यासाठी ई-वाहन धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत इलेक्ट्रीक वाहन खरेदीदारांना सवलती देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकही इलेक्ट्रीक वाहनखरेदीला प्राधान्य देत आहेत.
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा या तालुक्यांचा समावेश होतो. पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये २५ लाख वाहन नोंदणीचा टप्पा नुकताच पार झाला आहे. केंद्र शासनाने वाहनांवरील जीएसटीच्या दरात कपात केली. परिणामी वाहनांची खरेदी वाढली आहे.
--------------------------
वर्षनिहाय वाहन नोंदणी
वर्षे - वाहनांची नोंदणी
२०१९ - १,४६,१७३
२०२० - १,०१,४०८
२०२१ - १,०७,८११
२०२२ - १,४९,७०५
२०२३ - १,७७,८२३
२०२४ - १,९१,६०२
२०२५ - २,१७,९२०
एकूण - २५,१५,९२५
-----------------
आरटीओतील वाहनांची नोंदणी
वाहनांचा प्रकार - २०२४ - २०२५
दुचाकी - १,१७,६३८ - १,३२,८८६
तीनचाकी - ७,३४५ -८,०४६
मोटर कार - ४५,८२५ - ५१,९५२
बस - १,२६३ - ३,५६४
मोटर कॅब - ६,२५८ - ६,१२०
-------
मालवाहतूक - २४,९२५ - २९,३२८
बिगरमालवाहतूक - १,६६,६७७ - १,८८,५९२
------------
इंधननिहाय वाहनांची एकूण संख्या
पेट्रोल - ८९,९२५
डिझेल - २७,१३६
सीएनजी - ९,६४२
इलेक्ट्रिक - १६,१४९
एलएनजी - २९६
इथेनॉल - २८
पेट्रोल/सीएनजी - २३,७२१
पेट्रोल/इथेनॉल - ४५,८८९
हायब्रीड ३,७२१
-----
फोटो
81273

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com