गुंतवणूकदाराला ६१ लाखांचा गंडा
पिंपरी ः ऑनलाईन नफ्याच्या बहाण्याने आठ जणांनी गुंतवणूकदाराची ६१ लाख ९ हजार रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी ५३ वर्षाच्या व्यक्तीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. प्युअर प्रॉफिट शेअर मार्केट कंपनीधारक, ज्योती, पूजा, निकेत शहा, पियुश अग्रवाल, सी फाइव्ह इंटेक्स हंटर या व्हॉट्सॲप ग्रुपवरील करण सिंग, अलोक (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. आरोपींनी तक्रारदाराला कंपनीच्या कॅपिटल माँक अॅपमधून ३४ लाख ८९ हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवणूक करायला लावले. त्यांना तेवढ्याच रकमेचा नफा मिळाला नाही. १ मे ते २ नोव्हेंबर या कालावधीत व्हॉट्स ॲप ग्रुपवरील करण सिंगने कॉनीफर तक्रारदाराला आय.एन.व्ही. मधील शेअर्स व आय.पी.ओ.मध्ये २६ लाख २० हजार रुपये गुंतवणूक करायला लावली. त्यावरीलही नफ्याची रक्कम त्यांना परत करण्यात आली नाही.
----------
नांदेमध्ये गैरसमजातून तिघांवर शस्त्राने वार
पिंपरी ः आपल्या आईला कुत्री म्हणाल्याच्या गैरसमजातून दहा जणांनी तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. मुळशी तालुक्यातील नांदे येथील गजानन कृपा बिल्डिंगमध्ये सोमवारी (ता. २९) सायंकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेंद्र महेश जोयशी (ता. २३, रा. घर नं. ६७४ गजानन कृपा बिल्डींग कृष्णानगर नांदे, ता. मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अप्पासाहेब शिंदे याला अटक करण्यात आली असून आशिष सुर्वे (रा. गजानन कृपा बिल्डींग कष्णानगर, ता. मुळशी), सुजल सोळंकी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व त्यांच्या घरातील ३ ते ४ नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जोयशी यांनी कुत्री म्हणाल्याच्या गैरसमजातून सर्व आरोपींनी सुरेंद्र यांचे काका, चुलत भाऊ गौरव यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. आशिषचे सासरे अप्पासाहेब शिंदे यांनी सुरेंद्रच्या काकांना रॉडने मारहाण केली. आशिष सुर्वेने धारदार शस्त्राने सुरेंद्रच्या डोक्यात व त्यांच्या काकांच्या डोक्यात, डाव्या हातावर वार केले. चुलत भाऊ गौरव याच्याही डोक्यात आणि हातावर वार करण्यात आले. याप्रकरणी बावधन पोलिस तपास करीत आहेत.
--------
कागदपत्रांसह गाडी घेऊन चालक पसार
पिंपरी, ता. ३१ ः सीएनजी किट बसवून त्याची बुकवर आरटीओमध्ये नोंद करून आणतो, असे सांगून एक चालक कागदपत्रांसह गाडी घेऊन पसार झाला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) सायसराव भागवत जाधवर (वय ५०, रा. विजन रिजम सोसायटी, डुडुळगाव) यांनी तक्रार दिली. त्यानुसार आदित्य सीताराम यादव (रा. सुतरवाडा, पौड रोड, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जाधवर यांची सात लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट, आरसी बुक, स्टेट बॅंकेचा धनादेश, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे घेऊन यादव पसार झाला. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

