शत्रुघ्न काटे-नाना काटे यांच्यात ‘नुरा कुस्ती’!
पिंपरी, ता. ३१ : शहरात ‘शत-प्रतिशत’चा नारा देणारे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लढणारे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मधून मात्र सोयीस्कररित्या समोरासमोर न लढता वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे या दोन काटेंमध्ये ‘काटें की टक्कर’ न होता केवळ ‘नुरा कुस्ती’च होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नाना काटे यांचा पिंपळे सौदागर हा प्रभाग आहे. २००७ ची निवडणूक वगळता, हे दोन्ही स्थानिक नेते एकमेकांसमोर लढले नाहीत. २००७ च्या निवडणुकीत नाना काटे विजयी झाले होते; तर पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी शत्रुघ्न काटे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. त्यानंतर २०१२ व २०१७ मध्ये हे दोन्ही काटे सोयीस्कररित्या एकमेकांसमोर आले नाहीत. यावेळीही शत्रुघ्न काटे यांनी इतर मागासवर्ग संवर्गातून ‘अ’ जागेवर; तर नाना काटे काटे यांनी सर्वसाधारण संवर्गात ‘ड’ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
लक्ष्मण जगताप यांचाही आग्रह होता
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी शत्रुघ्न काटे यांना नाना काटे यांच्यासमोर लढण्याचा आग्रह धरला होता. परंतु; ते लढले नाहीत. तर, आता ‘‘मी इतर मागासवर्गीय जागेवरून लढतो. तुम्ही सर्वसाधारण जागेवर नाना काटे यांच्याविरोधात लढा,’’ असा प्रस्ताव जयनाथ काटे यांनी शत्रुघ्न काटे यांच्याकडे ठेवला होता. पण, यावेळीही शत्रुघ्न काटे व नाना काटे समोरासमोर आले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
