पिंपरी-चिंचवड
ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड कार्यकारणीची निवड
पिंपरी, ता. ४ ः चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक संघाची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२८ या कालावधीसाठी सदस्य व पदाधिकाऱ्यांसह स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिक्षक गणेश विपट यांनी निवडणूक अधिकारी म्हणून सहकार्य केले. अध्यक्षपदी रमेश इनामदार, उपाध्यक्षपदी गोपाळ भसे, कार्यवाह श्यामकांत खटावकर, सहकार्यवाह भिवाजी गावडे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, सहकोषाध्यक्षा अलका इनामदार, अंतर्गत हिशोब तपासणीस नारायण दिवेकर, सदस्य रत्नप्रभा खोत, नंदकुमार मुरडे, सुदाम गुरव, सुधाकर कुळकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर व शहाजी कांबळे व स्वीकृत सदस्य सुनील चव्हाण व सतीश लिपारे यांची निवड झाली आहे. माजी उपाध्यक्षा उषा गर्भे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.