राखी पौर्णिमेसाठी कस्टमाइज गिफ्टचा ‘ट्रेंड’ कायम
पिंपरी, ता. ५ ः राखी पौर्णिमेचा सण अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात राख्यांसोबतच भेटवस्तू घेण्यासाठीही गर्दी दिसत आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर्सला मोठी मागणी आहेच. मात्र, भावाला भेट म्हणून राखी प्लॅटर्स खरेदी करण्याकडे महिला व तरुणींचा कल दिसून येत आहे. ही प्लॅटर्स व हॅम्पर हवे तसे ऑनलाइनही मिळत असल्याने लांब राहणाऱ्या भावा-बहिणीला थेट कुरिअर करणेही सोपे झाले आहे.
आपल्या भावाची किंवा बहिणीची आवड, क्षेत्र आणि गरज लक्षात घेऊन विविध भेटवस्तू एका आकर्षक पद्धतीने एकत्रितरीत्या सजवून भेट देण्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये कल वाढला आहे. याला ‘पर्सनलाईज्ड गिफ्ट हॅम्पर’ असे म्हणतात. यामध्ये इमिटेशन ज्वेलरी, घड्याळ, परफ्युम, गॉगल, चॉकलेट यापासून ते पाण्याचे आकर्षक जग, मग, पेन, डायरी, फ्रिज मॅग्नेट अशाही वस्तूंचे हॅम्पर्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये आपल्या आवडीनुसार बदल करता येत असल्याने तसेच ऑनलाइन मागवल्यावर घरपोच मिळत असल्याने तरुण तरुणींचा कल हे हॅम्पर घेण्याकडे वाढला आहे. हे हॅम्पर ३०० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामध्ये आवडीनुसार आणि बजेटनुसार सोने, चांदीचे दागिने, वस्तू, वेलनेस कुपन यांचाही समावेश केला जात आहे.
राखी प्लॅटरची मागणी
राखीपौर्णिमेला बहीणही भावाला राखीसोबत काहीतरी भेटवस्तू देत असते. भाऊ लांब राहत असेल तर राखीसोबत भेटवस्तू आणि औक्षणाचे तबकही पाठविले जाते. यालाच राखी प्लॅटर असे म्हणतात. त्यामध्ये राखी, भेटवस्तू, औक्षणाचे तबक, मिठाई , चॉकलेट अशा वस्तूंचा समावेश असतो. परदेशी किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या भावाला कुरिअरद्वारे पाठविण्यासाठी या राखी प्लॅटरची मागणी होत होती. मात्र, हौस म्हणून औक्षण करण्यासाठीही अशा प्लॅटरला मागणी वाढली आहे. या प्लॅटरसाठी खास हवी तशी राखी, तबक डिझाईन करून घेण्याकडेही महिलांचा कल आहे.
रेझीनपासून बनविलेल्या राखी प्लॅटर आणि ‘की चेन’ला यावर्षी मोठी मागणी आहे. तसेच खास राखी पौर्णिमेसाठी ‘डेकोरेटिव्ह कॉपर प्लेटेड’ औक्षणाचे तबक देखील विकत घेतले जात आहेत. कस्टमाइज गिफ्ट या संकल्पनेला गेल्या काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद आहे. मात्र, यामध्येही नवीन काय देता येईल ? अशी विचारणा महिला करत आहेत.
- स्नेहा बडवे, महिला व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.