घरोघरी तिरंगा अन् स्वच्छता; महापालिकेचा विधायक उपक्रम

घरोघरी तिरंगा अन् स्वच्छता; महापालिकेचा विधायक उपक्रम

Published on

पिंपरी, ता. ५ ः महापालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ ही विशेष मोहीम सुरू आहे. त्या माध्यमातून देशप्रेम आणि स्वच्छतेचा जागर केला जात आहे. तीन टप्प्यांत आयोजित मोहीम १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे.
मोहिमेचा पहिला टप्पा दोन ऑगस्टला सुरू झाला. सात ऑगस्टपर्यंत शहरातील शाळा, सार्वजनिक ठिकाणी व पर्यटनस्थळांवर तिरंगा चित्ररचना, रांगोळी आणि स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीच्या भावनेसह स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे. दुसरा टप्पा नऊ ते १२ ऑगस्ट दरम्यान असेल. यामध्ये तिरंगा मेळा, तिरंगा कॉन्सर्ट, पर्यावरणपूरक तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जातील. ‘तिरंगा मेळा’ मध्ये स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणारा आणि ‘वोकल फॉर लोकल’चा संदेश देणारा हा उपक्रम असेल. तिरंगा कॉन्सर्टमध्ये देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरण होईल. पर्यावरणपूरक तिरंगा उपक्रमाद्वारे प्लास्टिकऐवजी कापडाचा व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून तिरंगा बनवण्याचा निर्धार नागरिकांमध्ये निर्माण करण्यात येणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मोहिमेचा तिसरा टप्पा असेल. त्यामध्ये स्वच्छतेशी निगडित महत्वाच्या ठिकाणी ध्वजवंदन करून त्या जागांचे संवर्धन आणि गौरव केला जाईल.

जनजागृतीपर विविध उपक्रम
- घरोघरी जाऊन कचरा स्वच्छतेची जनजागृती
- कचरा विलगीकरणाचे महत्व समजावणे
- प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देणे

१५ ऑगस्टनंतर ध्वजसंकलन
स्वातंत्र्य दिनानंतर नागरिकांनी वापरलेले राष्ट्रध्वजाचे संकलन करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. तरी नागरिकांनी त्यांनी वापरलेले राष्ट्रध्वज आरआरआर (रिड्युस, रीयुज, रिसायकल) केंद्रांमध्ये जमा करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहिमेमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेसाठीही नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये आपल्या शहराला स्वच्छतेत देशात अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com