संवाद माझा
देहू फाटा सांगा बरं कुणाचा ?
देहू फाटा म्हणजे समस्यांचे आगार आहे. त्याच्या उत्तरेस संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी. पश्चिमेस जगतगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या गावी जाणारा देहूरोड आणि दक्षिणेस चऱ्होली फाटा. आळंदीचा समावेश खेड तालुक्यात होतो; तर चऱ्होली फाटाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होतो. देहू फाट्यापासूनच पश्चिमेस साधारणतः दोनशे मीटर अंतरावरच महानगरपालिकेची हद्द सुरू होते. मग, सांगा देहू फाट्याचा विकास करणार कोण ? पुण्याकडून आळंदीला जातानाच चऱ्होली फाटा ओलांडला की आपल्याला लगेच जाणीव होते. ती म्हणजे खराब रस्ते, खड्डे, अतिक्रमण केल्यामुळे अरुंद झालेले रस्ते, विद्युत खांब आणि वाहिन्याचे जंजाळ. अनधिकृत जाहिरातीचे फलक, सकाळ-संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडीने हा परिसर ग्रासला आहे. मूळ रस्त्याचाच पत्ता नाही; तर पदपथ, सेवा रस्ता शोधणार कसा ?
- प्रफुल्ल बाबर, डुडूळगाव
PNE25V37707
सामान्य गरजांकडे लक्ष द्या
वाकड सेवा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर असे खड्डे असल्यामुळे ते चुकवून जाण्याकरिता कितीतरी लोकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे कोणाचा तरी जीव जातोय. कोणाला कायमचे अपगंत्व येतेय आणि कुटुंबाचा कायमचा आधार हरपला जात आहे. लोकांचा वेळ आणि पैसा पण खर्च होतोय. खूप साऱ्या कंपनी बाहेरच्या राज्यात स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत. जर लोक एवढा सारा कर भरत असतील; तर लोकांच्या सामान्य गरजांकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे हीच अपेक्षा.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE25V37706
जाहिरातदारांवर कारवाई करा
शहर परिसरात महापालिकेने विविध ठिकाणी झाडे लावली आहेत. मात्र, त्याचा वापर काही फुकटे जाहिरातदार
आपल्या व्यवसायाच्या जाहिराती झाडांवर लावण्यासाठी करत आहेत. त्यासाठी झाडांना मोठमोठे खिळे ठोकले जात आहेत. त्यामुळे झाडांना इजा होते. हे थांबायला पाहिजे. झाडांना खिळे मारणाऱ्या जाहिरातदारांवर महापालिकेने कडक कारवाई करावी.
- संजय मिस्त्री, निगडी
PNE25V37705
वाढलेल्या फांद्या छाटा
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनच्या पाठीमागे असलेल्या नवीन रस्त्यावर महापालिकेने पदपथ आणि त्यालगतच्या रस्त्यांवर वृक्षारोपण केले आहे. परंतु आता हे वृक्ष मोठे होऊन त्यांच्या फांद्या खूप खाली आल्या आहेत. त्यामुळे पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. वाहन चालकांना त्रास होत आहे. या परिसरात सतत रहदारी असते. तेव्हा, महापालिकेने एखादा अपघात होण्याअगोदर वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटून टाकाव्यात.
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
PNE25V37704
पिंपळे निलखमध्ये गतिरोधक हवेत
पिंपळे निलख येथे बापूजी बुवा मंदिर चौक आहे. जो इंग्रजी ‘वाय’ आकाराचा आहे. एक रस्ता मुख्य गावात जातो. दुसरा रक्षक चौकाकडे; तर तिसरा बाणेर बालेवाडीकडे जातो. बाणेर, बालेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहने भरधाव वेगाने येत असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या चौकात दुभाजकाची गरज आहे. तरी महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात दोन अडीच फूट उंचीचे प्लास्टिकचे स्प्रिंग रोल दुभाजक आणि गतिरोधक बसवावेत.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V37703
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.