डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला दोन पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला दोन पुरस्कार

Published on

पिंपरी, ता. ६ ः येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘बेस्ट बीएसडी’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक’ अशी पुरस्कारांची नावे आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील ‘सर्वोत्तम ब्रेन-स्टेम-डेथ टीम’ म्हणूनही गौरव झाला.
भारतीय अवयवदान दिनानिमित्त प्रादेशिक सहराज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेतर्फे मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात विशेष समारंभात पुरस्कार वितरण झाले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. रुग्णालयाच्या वासंती मुसाळदे व अलिशिबा वाकडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक’ पुरस्कार देण्यात आला.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आणि अवयवदान-प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. संगीता रावत यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
आबिटकर यांनी सांगितले की, ‘अवयवदान चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येणे आवश्यक आहे. प्रत्यारोपणानंतरचे निरोगी आणि सुदृढ आयुष्य सर्वांसमोर आणले पाहिजे. अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये लोकांची जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.’
---
या पुरस्कारांमुळे आमच्या रुग्णालयाच्या अवयवदान आणि प्रत्यारोपण मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे. आमची ही मोहीम अविरत सुरू राहील. आमच्या कार्याची दखल घेतल्याने आमच्या कामाची उंची अधिक वाढली आहे. या यशाबद्दल आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.
- डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ
---
अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील आमच्या रुग्णालयाचे काम आज अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरत आहे. आमच्या रुग्णालयात जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधा, अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर तसेच समुपदेशकांद्वारे अवयवदान व प्रत्यारोपण मोहिमेला गती मिळाली आहे आणि हा मिळालेला पुरस्कार त्याच कामाची पोचपावती आहे.
- डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com