संवाद माझा
तळेगावात गतिरोधक हवेत
तळेगाव दाभाडेमध्ये आरोग्य चांगले राहावे या करिता किंवा शहरात प्रदूषण किती आहे ? ते दर्शविणारा फलक लागला आहे. त्याबद्दल आभारी आहे. मात्र, रस्त्यावर चालताना दिवसा असो वा रात्री तळेगाव स्टेशन ते जिजामाता चौक, भंडारी हॉस्पिटल हा रस्ता ओलांडण्या करिता लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना खूप अडचणी येत आहेत. या बाबतीत नगरपरिषदेच्या प्रशासन विभागाने योग्य ती दखल घ्यावी. ठराविक ठिकाणी गतिरोधक आहेत. उर्वरित ठिकाणी मागणी केली; तर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे करता येत नाही, असे उत्तर दिले जाते. मग जे गतिरोधक आहेत; ते न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर बनविलेले आहे का ?
- एकनाथ जाधव, तळेगाव दाभाडे
PNE25V38054
पथदिव्यामुळे अपघाताचा धोका
तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगरमध्ये यशोधन हॉल समोरच्या रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबावर असलेले इलेक्ट्रिक युनिट उघडे पडले आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत, महावितरण कंपनी किंवा संबंधित विभागाने त्याची त्वरित दखल घ्यावी. तसेच आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ करावी.
- मोहन गद्रे, तळेगाव दाभाडे
PNE25V38057
फांद्या छाटून टाका
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनच्या पाठीमागे असलेल्या नवीन रस्त्यावर महापालिकेने पदपथ आणि त्या लगतच्या रस्त्यावर वृक्षारोपण केले आहे. परंतु आता हे वृक्ष मोठे होऊन त्यांच्या फांद्या आणि पाने खूप खाली आली आहेत. त्यामुळे पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यावर फांद्या व पाने आल्यामुळे वाहन चालकाला त्रास होतो. या परिसरात सतत रहदारी असते. तेव्हा, महापालिकेने अपघात होण्याअगोदर वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटून टाकाव्यात.
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
PNE25V38059
चिखलीतील बग वस्ती येथील महापालिकेची मुख्य जल वाहिनी फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. सुमारे एक किलोमीटरपर्यंत रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरच पाणी जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्वरित जलवाहिनीची दुरुस्ती करावी.
- अरुण शिंदे, चिखली
PNE25V38058
पावसाळी वाहिनीवरच खड्डे
चिंचवड येथील एसकेएफ कंपनी समोरील रस्त्यावर पदपथाशेजारी असलेल्या पावसाळी वाहिन्यांवरच खड्डे घेण्याचा अजब कारभार महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. पिंपळ. वड व इतर मोठ्या झाडांची लागवड करुन अनोखा विकास करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
- दिलीप गोते पाटील, भोईर कॉलनी, चिंचवड
Id: PNE25V38055
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.