पैसे मागितल्याने हॉटेल मालकाला 
पिस्तुलाच्या धाकाने धमकी

पैसे मागितल्याने हॉटेल मालकाला पिस्तुलाच्या धाकाने धमकी

Published on

पिंपरी : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर जेवणाचे आणि दारूचे बिल मागितल्याने दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. तसेच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी निवृत्ती एकनाथ वाघ (रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनी अशोक परदेशी (वय ३२, रा. शास्त्री चौक, पिंपरी) आणि रोहित बोथ (वय २५, रा. शास्त्री चौक, पिंपरी) यांना अटक केली आहे. आरोपींनी खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून दारू पिल्यानंतर त्याचे १ हजार ९४३ रुपयांचे बिल देण्यास नकार दिला. फिर्यादीने बिल मागितले असता त्यांना शिवीगाळ करून, ‘तुला गोळ्या घालतो, तू मला ओळखत नाहीस काय’ असे म्हणून धमकावले. तसेच आरोपी सनी याने कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीला जिवे मारण्याची भीती घातली.

चाकूच्या धाकाने खंडणी उकळली
पिंपरी : चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाकडून रोख रक्कम, ऑनलाइन पैसे आणि दारूची मागणी करून खंडणी उकळली. ही घटना मोरवाडी चौक ते काळभोरनगर या मार्गावर घडली. याप्रकरणी गुलशनकुमार योगेंद्र राय (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोज आनंद शिंदे (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) आणि आकाश अर्जुन खोडके (वय २७, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली, मूळ- जळगाव) यांना अटक केली आहे. फिर्यादी हे पायी चालत जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या बँक खात्यातील सर्व पैसे आणि दारू देण्याची मागणी केली. यामुळे घाबरून फिर्यादीने त्यांना १० हजार रुपये रोख, १० हजार रुपये ऑनलाइन आणि ५२५ रुपयांची दारू घेतली.

मॅफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : बेकायदारित्या एमडी (मॅफेड्रोन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचे मॅफेड्रोन जप्त केले. ही कारवाई वाकडमधील कावेरीनगर भाजी मंडईजवळ करण्यात आली. बालाजी भारत चकृपे (वय ३७, रा. सावंत नगर, दिघी) आणि समाधान गणेश गंगणे (वय १९, रा. शिवशाही नगर, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कावेरीनगर भाजी मंडईजवळ मॅफेड्रोन विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बालाजीकडून २ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ५६.८० ग्रॅम एमडी पावडर आणि आरोपी समाधानकडून ५९ हजार २०० रुपये किमतीचे ११.८४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. दोघांकडून एकूण ३ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचे एमडी जप्त केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com