‘एचएसआरपी’च्या लाखो पाट्या पडून

‘एचएसआरपी’च्या लाखो पाट्या पडून

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटीसाठी (एचएसआरपी) ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंटच्या तारखेपासून तीन महिने वैधता आहे. यानंतरही असंख्य वाहनमालक नोंदणी करूनही या पाट्या बसवून घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी ‘फिटमेंट सेंटर’मध्ये लाखो पाट्या पडून आहेत.
एका बाजूला नोंदणी करून अपॉइंटमेंटसाठी दीड ते दोन महिने प्रतिक्षा करावी लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला अपॉइंटमेंट घेऊनही अनेक वाहनमालक पाट्या बसवायला वाहन नेत नसल्याने इतरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
परिवहन विभागाने राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक केले आहे. एक जानेवारीपासून ‘एचएसआरपी’ बसविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘एचएसआरपी’ उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वाहनमालकांना संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून जवळील ‘फिटमेंट सेंटर’साठी ‘अपॉइंटमेंट’ घ्यावी लागते. प्रत्यक्षात तीन महिने वैधता असूनही वाहनमालक दुर्लक्ष करत आहेत.
---
२४ लाख २६ हजार ७ ः पिंपरी-चिंचवड आरटीओकडील वाहनांची नोंद
१५ लाख ३९ हजार ः २०१९ पूर्वीची वाहने
४ लाख ३९ हजार ६९७ ः ‘एचएसआरपी’साठी नोंद झालेली वाहने
२ लाख ७८ हजार ९६६ ः ‘एचएसआरपी’ बसविलेली वाहने
१ लाख ६० हजार ७३१ ः नोंदणी करूनही ‘एचएसआरपी’ न बसविलेली वाहने
(१३ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी)
-----------
वाहनमालकांनी ‘एचएसआरपी’साठी नोंदणी करून सहा महिने झाले तरीही पाट्या बसवून घेतलेल्या नाहीत. साधारणतः एक लाखाच्या जवळपास नंबरप्लेट पडून आहेत. अपॉइंटमेंटच्या तारखेनंतर तीन महिन्याच्या आत ‘एचएसआरपी’ बसवून घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणाऱ्यांना फेरनोंदणी करावी लागणार आहे.
- आदिनाथ सामंत, संचालक, ‘फिटमेंट सेंटर’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com