स्‍वप्‍नातले घर उतरणार सत्‍यात

स्‍वप्‍नातले घर उतरणार सत्‍यात

Published on

पिंपरी, ता. १९ : वाकड, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, माण, मारुंजी, जांबे, सांगवडे, गहुंजे या भागांतील घर, कमर्शियल शॉप घेण्याचे तुमचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. परवडणाऱ्या आणि आपल्‍याला हव्‍या असलेल्‍या सदनिकांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ माध्यमातून मिळणार आहे. ही सुवर्णसंधी ताथवडे येथील सिल्व्हर बँक्वेट येथे शनिवारी (ता. २३) आणि रविवारी (ता. २४) तुमच्यासाठी उपलब्ध असेल.
यात शहरातील तीसपेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या १०० पेक्षा जास्त प्रीमियम प्रॉपर्टीजची माहिती मिळणार आहे. घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण, ते कुठे घ्यावं? त्या भागाला ''कनेक्टिव्हिटी'' आहे का? आपल्या बजेटमध्ये घर मिळेल का ? २, ३ बीएचके सोईचे की ४ बीएचके ? प्लॉट घेऊन घर बांधावे की प्रीमियम प्रॉपर्टी शोधावी? असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. या सर्वांची उत्तरे ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये मिळणार आहेत. याशिवाय एकाच छताखाली अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

प्रीमियम शोरूम, शॉपला मागणी
पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि ब्रँडेड वस्तुंविषयीचे आकर्षण यामुळे बिझनेस सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे. उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे उत्तम प्रकारे प्रेझेन्टेशन करण्यासाठी मुख्य बाजारपेठेमध्ये ‘हाय प्रोफाइल लोकेशन’ हवे आहे. त्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासक बिझनेस टॉवर्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आणि मल्टीपर्पज मॉल्स यांची निर्मिती वेगाने करत आहेत. ग्राहकांचे खरेदी व्यवहार ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक शोरूम स्पेस, दुकाने आणि मॉल्समध्ये जागेचा शोध घेत आहेत. त्यांच्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये प्रीमियम शोरूम आणि शॉप उपलब्ध असणार आहेत. तरी, नागरिक तसेच उद्योजकांनी शहरातील प्राइम लोकेशनची निवड करून आपल्या व्यावसायिक वृद्धीसाठी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ अवश्य भेट द्यावी.
---
चौकट :
कधी ?, कुठे ? केव्हा ? -
कधी ? : २३ व २४ ऑगस्ट
कुठे ? : सिल्व्हर बँक्वेट, ताथवडे
केव्हा ? : सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग : मोफत
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७१८८४०
---
बांधकाम व्‍यावसायिक म्‍हणतात
वाकड भागात परवडणारी घरे उपलब्ध नसल्‍यास किंवा आपल्‍याला अपेक्षित असलेली सदनिका मिळत नसल्‍यास अनेक नागरिक ताथवडे, पुनावळे, रावेत आदींसह त्‍या भागात प्राधान्‍य देत आहेत. या परिसराला अनेक विकसकही प्राधान्‍य देत आहेत. हा परिसर राहण्यासाठी योग्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या सुविधांनी युक्‍त असा आहे. त्‍यामुळे नागरिकांना तो उपयुक्‍त ठरत आहे. चंद्ररंग ग्रुपचे पिंपळे गुरव परिसरात दोन प्रकल्‍प कार्यरत आहेत.
- आदित्‍य जगताप, संचालक, चंद्ररंग ग्रुप
---
रावेत येथे आदित्‍य व्‍हीवाज नावाने प्रकल्‍प सुरू आहेत. सध्या या भागात बीआरटीचे जाळे असल्‍याने वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत चालत आहे, तसेच निगडी ते चाकण हा नियोजित मेट्रो मार्ग आहे. लवकरच मेट्रो होऊन रहिवाशांना त्‍याचा फायदा होणार आहे. महामार्गामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी आहे. विमानतळ, आकुर्डी रेल्‍वे स्थानक जवळ आहे. मुख्य म्हणजे रावेतमध्ये महापालिकेच्‍या सुविधा आहेत. त्‍यामुळे हा भाग राहण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
- संतोष कटारिया, भागीदार, आदित्‍य बिल्डर
----

मुंबई ते पुणे महामार्ग, मेट्रोचे विस्‍तारणारे जाळे, महाविद्यालयांची निर्मिती झाल्‍याने शिक्षणाची पोचलेली ज्ञानगंगा यामुळे ताथवडे आणि आजूबाजूच्‍या परिसरात नागरिक राहण्यासाठी प्राधान्‍य देत आहेत. पुणे-बंगळूर महामार्ग जवळ आहे. त्यामुळे हे राहण्यासाठी प्राइम लोकेशन आहे. त्यासाठी राजवीर गरिमा नावाने वाकड भागात टू आणि थ्री बीएचके प्रकल्‍प सुरू आहेत.

- संदीप वाघेरे, संचालक, वाघेरे असोसिएटस
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com