माझा प्रभाग, माझी जबाबदारी ः राजेंद्र जगताप

माझा प्रभाग, माझी जबाबदारी ः राजेंद्र जगताप

Published on

माझा प्रभाग, माझी जबाबदारी ः राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका


विकसित सांगवी-पिंपळे गुरव हेच जीवनध्येय

इंट्रो ः पिंपळे गुरव परिसरात समाजकारणापासून राजेंद्र जगताप यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आज तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आहे. नगरसेवकपदाची जबाबदारी सोपविल्यावर त्यांनी जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. विविध पदावर काम करीत असताना नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसराचा विकास कसा होईल, यासाठी जगताप हे कायम धडपडत आले आहेत. कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राला विकासाच्या मोठ्या टप्प्यावर पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. व्यापक दृष्टी, मोठा लोकसंपर्क, प्रश्न सोडवण्याची जिद्द या शिदोरीवर पुढे वाटचाल करीत भविष्याचा वेध घेत आपले सांगवी-पिंपळे गुरव विकसित कसे होईल, हेच जगताप यांचे जीवनध्येय बनले आहे.
-------------
जगताप यांच्या मनात सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची आवड निर्माण झाली ती त्यांच्या आई-वडिलांमुळे. त्यांच्या संस्कारामुळे कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना २०१२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळाल्यावर राजेंद्र जगताप हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. २०१२ ते २०१७ या कालावधीत नगरसेवक म्हणून तत्कालीन प्रभाग क्र. ५७ चे काम केले. आता पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या निवडणूक २०२५-२०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रभाग क्र. ३१ मधून जगताप हे इच्छुक आहेत.
सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपलिकेत २०१२ ते २०१७ या कालावधीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेमधून अनेक विकास कामे केली. सर्वांच्या समस्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मांडून त्या सोडविण्याचा राजेंद्र जगताप यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. २०१७ ते २०२२ या कालावधीत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात राहून समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहिले. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करावयाची आहे. प्रभागातील अनेक विकासकामे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

विकासाची दृष्टी अन् इच्छाशक्ती
शहरी भागातील समस्यांची जाण असण्यासोबतच राजेंद्र जगताप यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि विकास साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती आहे. पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील ‘जे जे नवे, ते ते हवे’, असा ध्यास मनाशी बाळगत असतानाच तरुणाईच्या हाताला रोजगाराच्या संधी कशा मिळतील, याचा विचार करण्यास आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करीत स्वयंरोजगार, लघुउद्द्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करून आवश्यक ते सहकार्य करण्यास जगताप हे बांधिलकी स्पष्ट करत असतात. नागरी सुविधा, रोजगार निर्मिती, महिला सबलीकरण असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास जगताप हे बांधिलकी व्यक्त करत असतात.


शाहू-फुले-आंबेडकर विचार
छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर ही महाराष्ट्राची विचारधारा प्रमाण मानून महिला, तरुण, बहुजनांचे हित व त्यांच्या विकासावर जगताप यांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच सामाजिक समन्वय साधून उपलब्ध संसाधने व तरुणाईची शक्ती यांचा योग्य वापर करून सुसंस्कृत, सुसंपन्न नवी सांगवी, पिंपळे गुरव करण्याला त्यांचे प्राधान्य राहणार आहे. महिला विकास, शिक्षण, रोजगार, उद्योग व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर विविध योजना राबविण्यासाठी जगताप यांची नेहमीच धडपड असते. पाणी, वीज, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधा या मतदारसंघातील समस्यांवर कायमचा उपाय शोधण्यावर त्यांचा भर राहणार आहे.


धार्मिक सलोखा

विकासाच्या प्रत्येक टप्प्यात सर्वत्र शांतता व सलोखा नांदणे फार महत्त्वाचे असते. विविध धर्म, जातीच्या नागरिकांना आपले मानून धार्मिक व जातीय सलोख्याचे वातावरण वाढीस लागण्यासाठी जगताप हे सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. शिवाय विविध धर्मांच्या सणांमध्ये सहभाग नोंदवून सामाजिक एकता साधण्यावरही त्यांनी सदैव भर दिला आहे. भविष्यातही आपला परिसर शांत, सलोख्याचा कसा राखता येईल ? यासाठी ते प्रयत्नशील असणार आहे.

सुरक्षित प्रभाग हीच जबाबदारी
पिंपळे गुरव हे कायम शांत व सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. पिंपळे गुरवमधील प्रत्येक नागरिक विशेषतः मुली, महिला सुरक्षित असायला हव्यात. या परिसराची हीच ओळख कायम राखण्यासाठी जगताप हे कटिबद्धता व्यक्त करतात. दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. समाजात गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः महिलांवर होणाऱ्‍या अत्याचारांचे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. महिलांना स्वतःची सुरक्षा करण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्याचे धोरण ते अवलंबणार आहेत.

वाहतूक सुधारणा
वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी पार्किंगसाठी जागा नसणे ही सध्या सांगवी, पिंपळे गुरवकरांना भेडसावत असलेली मोठी समस्या आहे. वाहतूक तसेच पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विविध उपाय शोधण्याला जगताप यांचे प्राधान्य राहणार आहे. स्वतंत्र पार्किंग आणि वाहनतळ व्यवस्था करण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद करून घेऊन वाहतूक कोंडीमुक्त सांगवी-पिंपळे गुरव करण्याचे जगताप यांचे लक्ष्य आहे.

महिला स्वच्छतागृह
नवी सांगवीच्या सर्वच भागांमध्ये स्वच्छतागृह असावेत आणि त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून घेण्याला जगताप यांचे प्राधान्य असणार आहे. पुरुष स्वच्छतागृहांप्रमाणे महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छ स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहे. महापालिका स्तरावर पाठपुरावा करून परिसरात ‘गरज तेथे स्वच्छतागृह’ उभारण्याला त्यांचे प्राधान्य राहणार आहे.

व्यापारी वर्गाचे प्रश्‍न
वाढता व्यापार हा समाजाच्या भरभराटीचे लक्षण असते. हा व्यापारच अडचणीत सापडला; तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्या व्यापाऱ्‍यापर्यंत सगळ्यांच्या समस्या सोडविण्याला जगताप यांचे प्राधान्य असणार आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका
सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी, या दृष्टीने प्रशस्त व सर्व सोयींनीयुक्त अभ्यासिका उभारण्याकडे जगपात यांचे लक्ष राहणार आहे. जेणेकरून या परिसरातील अनेक युवक-युवती प्रशासकीय सेवेत करिअर करतील. पिंपळे गुरव प्रभागातील महापालिका शाळा व इतर शाळांकडेही त्यांचे विशेष लक्ष असेल. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर मिळावेत, चांगले ग्रंथालय, अभ्यासिका उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे जगताप मानतात.

सामाजिक आरोग्य
समाजाचे आरोग्य हेच प्रभागाचे पर्यायाने देशाचे आरोग्य असते. सार्वजनिक स्वच्छता अधिकाधिक उत्तम कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. अस्वच्छ नदीपात्र ही एक मोठी समस्या आहे. नदीपात्राची स्वच्छता व सुशोभीकरणही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याकडे जगताप नेहमीच गांभीर्याने पाहत आले आहेत.

ज्येष्ठांसाठी विरंगुळा
ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात विरंगुळा केंद्रे उभारली आहेत. तिथे वृत्तपत्रे ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ अधिक आनंदात घालवता यावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, हा त्या पाठीमागे उद्देश आहे. सामाजिक आनंदाचा निर्देशांक वाढवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असल्याचे जगताप यांची भावना आहे.


पिंपळे गुरव व नवी सांगवीच्या मध्यावर असलेले आरक्षण क्रमांक ३४६ व ३४७ (अ) वर खेळाचे मैदान नियोजित आहे. त्याचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो क्रीडा विभागाला सादर करून खेळाची वेगवेगळी सुविधा आणि व्यवस्था विकसित करून परिसरात खेळाडू घडविण्यावर भर राहणार आहे.
- कार्यसम्राट माजी नगरसेवक राजेंद्र जगताप

कार्यकाळातील विकासकामे
- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्याशी चर्चा करून कलाप्रेमी नागरिकांसाठी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह हे बांधण्यात आले.
- भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून २००० हून अधिक युवक-युवतींना नोकरी देण्यात आली.
- कोरोना काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन जगताप यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
- कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याला पंचक्रोशीतील सांप्रदायिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
- दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून आणि जगताप यांच्या पाठपुराव्यातून पिंपळे गुरवमध्ये अत्याधुनिक बस टर्मिनलचे काम नियोजित आहे.
- २०१२ ते २०१७ या कार्यकाळात पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीचे आरसीसीमध्ये नूतनीकरण करण्यात आले. तसेच सुसज्ज दशक्रिया विधी घाट बांधण्यात आला.
- पिंपळे गुरव भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून २०१२ ते २०१७ या कार्यकाळात शाळेचा एक मजला वाढवून पिंपळे गुरव माध्यमिक शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली.
- नवी सांगवी, पिंपळे गुरवकरांची पाण्याची समस्या व वाढती लोकसंख्या विचारात घेऊन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून व राजेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यातून २०१२ ते २०१७ या कार्यकाळात २० दशलक्ष लिटर पाण्याची टाकी बांधून सर्व भागात ६ इंची व्यासाच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या.
- कोरोना काळात अन्नधान्याचे किट, भाज्या तसेच नवी सांगवीतील सुरुची हॉटेल येथे कोविड सेंटर सुरू करून रुग्णांची खाण्यापिण्यासह सर्व सोय करण्यात आली.
- श्रमजीवी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना श्री लक्ष्मण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्वरित कर्ज मिळण्याविषयी प्रयत्न.
- पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १७ वर्षांपासून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

इतर विकासकामे
- प्रभागातील नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वात पहिली क्षेत्रिय सभा प्रभाग क्र ३१ मध्ये ड प्रभाग अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत कै. काळुराम जगताप तलाव काटेपुरम इथे घेतली.
- ड प्रभाग क्षेत्रिय कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागात प्रभात फेरी घेण्यात आली.
- वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून सर्व चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. तसेच प्रभागात सर्व मुख्य रस्त्यावर पी-वन, पी-टूचे फलक बसविण्यात आले.
- प्रभागातील महिला बचत गटाच्या सदस्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला बालकल्याण विभागाच्यावतीने तसेच कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ५००० महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले.
- प्रभागातील सर्व चौकांचे सुशोभिकरण करून तेथे विविध स्टॅच्यू बसविण्यात आले.
- २०१२ ते २०१७ या कालावधीत जगताप व महापौर शंकुतला धराडे यांनी २०१९ पर्यंत विकास कामांच्या निविदा मंजूर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com