‘रिव्हर सायक्लोथॉन’ मध्ये घुमणार शिव-शंभू यशोगाथा
पिंपरी, ता. २२ : इंद्रायणी नदी स्वच्छतेचा जागर संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ या भव्य उपक्रमात यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ‘शिव-शंभू यशोगाथा’ या विशेष कार्यक्रम ठरणार आहे. वारकरी परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शिवकालीन गौरवाचा भव्य आविष्कार यावर्षी पाहायला मिळणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. रविवारी (ता. २३) सकाळी सहा वाजता ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून सायक्लोथॉनची सुरवात होणार आहे. या वेळी रणमर्द शिलेदारांचे संचलन, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा ठेका आणि मशाल-दिवटी नृत्य असे विविध कार्यक्रम होतील.
३५ हजार सायकलपटू सहभागी
‘अविरत श्रमदान’चे डॉ. नीलेश लोंढे यांनी सांगितले की, ३५ हजार सायकलपटूंच्या माध्यमातून या संदेशाची प्रभावी जनजागृती होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, डब्लूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात पाच, १५ आणि २५ किलोमीटर अशा तीन ट्रॅकवर हजारो सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला.
---
इंद्रायणी ही आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहे. तिच्या स्वच्छतेसाठी जनसामान्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ मधील ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा आपल्या इतिहासाचा गर्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकत्र घेऊन जाणारा अद्वितीय उपक्रम आहे. ३५ हजारांहून अधिक सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहून नदी संवर्धनाचा लढा निश्चितच अधिक बळकट होईल. यावर्षीची सायक्लोथॉन ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला समर्पित केली आहे. शिव-शंभूप्रेमी आणि सायकलपटूंसह तमाम पिंपरी चिंचवडकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हावे.
- महेश लांडगे, आमदार
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

