ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ''आधार''

ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ''आधार''

Published on

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण असावे, त्यांच्या इतरही अडचणी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. विशेषत: एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दर आठवड्याला भेट घेत विचारपूस आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आयुक्तालयासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात एक पोलिस उपनिरीक्षक व तीन कर्मचारी आहेत. हे पथक त्यांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन भेट असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शिवाय, काळजी घेण्यासाठी माहिती देण्यासह जागरूक राहण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
---------
ज्येष्ठांच्या मदतीसाठी पोलिसांचा
१०९० हेल्पलाइन क्रमांक
-----------
माझा मुलगा अमेरिकेला असल्याने मी सांगवी येथे एकटीच राहते. याबाबत पोलिसांना माहिती आहे. दरम्यान, दर आठवड्याला सांगवी पोलिस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला अंमलदार माझ्या घरी भेट देतात. सर्व विचारपूस करून आवश्यक मदत करतात. पोलिसांचे बारीक लक्ष असते.
- ज्येष्ठ नागरिक, सांगवी.
-------
ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून ज्येष्ठ नागरिकांची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यांच्या सुरक्षा तसेच इतर मदतीसाठी आम्ही सतत ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात असतो. यासाठी विविध मेळावे, मार्गदर्शन सत्र राबविण्यासह एकट्या, दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या घरी दर आठवड्याला प्रत्यक्ष भेटतो.
- अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष.
--------
आकडे बोलतात...
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक संघ - १५७
सन २०२४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे एकूण तक्रारी अर्ज - १४६
तक्रार अर्जाची निर्गती-१४२
घरगुती अडचणीच्या एकूण तक्रारी-८१
मालमत्तेबाबतच्या तक्रारी - ६५
------
पोलिसांकडून केली जाणारी मदत
एकट्या राहणाऱ्या नागरिकांच्या घरी भेट देत वैद्यकीय मदत, घरगुती गॅस सिलिंडर अथवा पेन्शन इत्यादी कामे करुन देण्यासाठी मदत, ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठका घेऊन त्यांना ज्येष्ठांचे हक्क व कर्तव्य तसेच कायदेशीर माहिती देणे, सायबर फसवणूक टाळण्यासाठी सायबर सेलकडील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, जे प्रश्न पोलिस खात्याच्या कार्यकक्षेत येत नाहीत, त्यांना ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरणामार्फत मार्गदर्शन करणे.
------
*ज्येष्ठांनी ही घ्यावी काळजी
- बँकेत पेंशनसाठी जाताना सोबत कोणाला तरी घ्यावे, व्यवहाराबाबत केवळ बँक कर्मचाऱ्यांशीच चर्चा करा
- बँकेतून जाता-येता असुरक्षित वाटत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- एटीएमधून पैसे काढण्यासाठी अज्ञात किंवा अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये.
- घरात एकटे असताना अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नये.
- घरात कामाला व्यक्ती ठेवताना पोलिसांकडून त्यांचे चारित्र्य पडताळणी करावी
- अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती तसेच फोन नंबर देऊ नये.
- घराबाहेर जाताना अंगावर दागिने परिधान करू नयेत.
- निवृत्तीनंतरच्या पैशांची शासकीय बँकेत किंवा टपाल कार्यालयातच गुंतवणूक करावी.
- जॉगिंग किंवा चालत असताना जागरूकता पाळणे आवश्यक
----------
आठवड्यात दोन ज्येष्ठांची कोट्यवधींची फसवणूक
दोन ज्येष्ठांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे दोन प्रकार या आठवड्यात समोर आले. एका प्रकरणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ व्यक्तीची दोन कोटी ५२ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाली. तर दुसऱ्या प्रकरणात ज्येष्ठ महिलेला विमा काढण्याचे आमिष दाखवून त्यांची दोन कोटी तीस लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com