

पिंपरी, ता. २५ ः शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिंगत होण्यासाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांत आयोजित जनसंवाद सभेत ९५ तक्रारवजा सूचना नागरिकांनी मांडल्या. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील उपस्थित होते. त्यांनी शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावाही घेतला. यामध्ये महापालिका संकेतस्थळ सुसज्ज करणे, सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, नवउद्योजकांना सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, अशा बाबींचा समावेश होता. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, प्रत्येक विभागाच्या नावाच्या पाट्या आदी कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ते म्हणाले, ‘‘नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी कालावधीत सोडवण्यासाठी जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत. नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.’’
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.