व्हेरॉक-वेंगसरकर संघाची विजयी सलामी
पिंपरी, ता. २५ ः पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्यावतीने थेरगाव येथे आयोजित १५ वर्षांखालील मुलांच्या व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी शानदार सुरुवात झाली. यजमान व्हेरॉक-वेंगसरकर संघाने विजयी सलामी दिली. शतकवीर श्रवण राठोड सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेचे उदघाटन महापालिकेतील उपअभियंता निखिल फेंडर यांच्या हस्ते झाले. अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, डॉ.विजय पाटील उपस्थित होते. पहिल्या साखळी सामन्यात यजमान व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमीवर १४२ धावांनी दणदणीत विजय मिळविला. विजयी संघाचा सलामीवीर श्रवण राठोड याने १२८ चेंडूंत १०८ धावा फटकावल्या. अभिषेक टोपणो (६३ धावा) आणि झिदान मंगा (नाबाद ४७ धावा) यांनीही चांगली फलंदाजी केली. पराभूत संघाकडून अद्वैत कृष्णा (३ बळी) याने तर विजयी संघाकडून शारव शाह (३ बळी) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पराभूत संघाच्या फलंदाजांना मोठी खेळी आणि भागिदाऱ्या करता आल्या नाही.
संक्षिप्त धावफलक
व्हेरॉक - वेंगसरकर ः ४५ षटकांत ६ बाद २५७ - श्रवण राठोड १०८, अभिषेक टोपणो ६३, झिदान मंगा ४७ (अद्वैत कृष्णा ३-३९, हित कारिया २-५६) वि.वि. स्पार्क स्पोर्टिव्ह ः २६.१ षटकांत सर्वबाद ११५ ः अद्वैत कृष्णा १७ (शारव शहा ३-२४, प्रज्योत गुंडाले २-६, अर्णव माधुगिरी २-२२, साईश बारटक्के २-४).
PNE25V00803, PNE25V00804
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

