झोनल ॲथलेटिक्स स्पर्धेत एम. एम. पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

झोनल ॲथलेटिक्स स्पर्धेत एम. एम. पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

Published on

पिंपरी, ता. २५ ः महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीतर्फे आणि इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत पुण्यात आयोजित झोनल ॲथलेटिक्स स्पर्धेत थेरगावच्या एम. एम. पॉलिटेक्निकच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले.
या स्पर्धेत एकूण २१ संघांनी सहभाग घेतला. २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक यासारख्या विविध खेळांमध्ये एम. एम. पॉलिटेक्निकच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. मंथन राजपूत याने २०० मीटर शर्यत व लांबउडीमध्ये सुवर्णपदके, सिद्धी तिळेकर हिने ४०० मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण, सिद्धी वाडेकर हिने ४०० मीटर व उंचउडी प्रकारांत रौप्यपदके पटकाविली. तर शांभवी लुगडे हिने थाळी फेकमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. विविध गटांमध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक पदके पटकावली. एम.एम.पॉलिटेक्निकचे क्रीडा संचालक डॉ. सुशील शिंदे यांच्यामार्फत खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. एम. एम.पॉलिटेक्निकच्या खेळाडूंच्या या यशामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची नव्याने ओळख निर्माण झाली आहे, असे एम.एम. पॉलिटेक्निकच्या प्राचार्या गीता जोशी यांनी नमूद केले. तसेच सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com