वायसीएम रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी, ता. २५ : उपचारासाठी आईसोबत आलेल्या व्यक्तने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना मंगळवारी (ता.२५) दुपारी घडली. सदर रुग्ण यात गंभीर जखमी झाला आहे.
हा चाळीस वर्षीय रुग्ण राजगुरूनगर येथील आहे. तो त्याच्या आईसमवेत वायसीएम रुग्णालयात आला. आई केस पेपर काढत असताना त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला व शरीराला दुखापत झाली. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली. त्यावेळी डॉक्टरांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या रुग्णाला मानसिक आजार असल्याची शक्यता वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी वर्तवली असून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

