युनिक व्हिजन स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात

युनिक व्हिजन स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात
Published on

पिंपरी, ता. ७ ः चिंचवडेनगर येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित
क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. विविध क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त कमांडो प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले.
आमदार शंकर जगताप, भाजप उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, पुणे जिल्हा कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक फरगडे, भाजप कोषाध्यक्ष संतोष निंबाळकर, महेश बारसावडे, माणिक मेहत्रे, सुभाष कारंडे, आदेश नवले व सर्व विश्वस्त यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाविषयी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण झाले. नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० मीटर धावणे, २०० मीटर रिले, लिंबू-चमचा इत्यादी स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. कमांडो प्रशिक्षणा अंतर्गत विद्यार्थ्यांना धनुर्विद्या, नेमबाजी, रॅपलिंग, लाठीकाठी, फायर फायटिंग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले. ब्रेन वल्ड ग्रुप अंतर्गत बेस्ट स्कूल इन स्पोर्ट्स एज्युकेशन हा पुरस्कार मिळाला. स्पर्धांतील पदक विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या संचालिका नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी भंगाळे सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. प्रियांका गोडसे, सुप्रिया दिवाकर, कमल पावसे यांनी संयोजन केले. स्नेहल पवार यांनी आभार मानले.
PNE25U78796

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com