पिता-पुत्राला मारहाण, तिघांवर गुन्हा
पिंपरी : पिता-पुत्राला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपरीतील लक्ष्मी मार्केट येथे घडली. याप्रकरणी रोहित विशाल वावरे (रा. रेल्वे स्थानकाशेजारी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर रणजीत कदम (वय २६), राहुल रणजीत कदम (वय ३५) व बबलू रणजीत कदम (वय ३०, सर्व रा. लक्ष्मी मार्केट, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे वडील हे त्यांचे चावीचे दुकान बंद करीत असताना दुकानासमोर राहणारे आरोपी तेथे आले. ‘गाणी कोण वाजवतेय’ असे म्हणत शिवीगाळ करीत असताना फिर्यादीच्या वडील म्हणाले की, गाणी वाजवणारी मुले निघून गेली. या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी अमर कदम यास वडिलांना शिव्या का देतोस असे म्हणाले असता, त्याने फिर्यादी यांनाही शिवीगाळ करून टोकदार टोच्याच्या साहाय्याने कपाळावर मारून जखमी केले.
गॅस सिलिंडरचा काळाबाजार; एकावर गुन्हा
पिंपरी : धोकादायक पद्धतीने व बेकायदारित्या एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस काढून गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई चिखलीतील जाधववाडी येथे करण्यात आली. अनिल हनुमंतराव फुले (वय ५५ रा. जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने धोकादायक पद्धतीने व बेकायदारित्या एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस काढला. त्या गॅसच्या भरलेल्या टाक्या चढ्या दराने विक्रीसाठी उपलब्ध केल्या. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून गॅस टाक्या तसेच गॅस ट्रान्स्फर करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जुगारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडीतील तापकीरनगर येथे केलेल्या कारवाईत जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कालिदास ज्ञानेश्वर दिवसे (वय ४४), नथुराम शंकर बनकर (वय ५६), सूरज भास्कर पाटील (वय ३१), देवराम आत्माराम रागपसरे (वय ३३), सुनील मधुकर ढोकळ (वय ५४), कबीर मुनीर सय्यद (वय ४५), अक्षय सुरेश गुंजेकर (वय ३१) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे आरोपी भारत माता चौक येथील एका शाळेशेजारी पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार कोण चालवितो? असे पोलिसांनी विचारले असता बिंदू यादव हा जुगार चालवीत असल्याचे आरोपींनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

