चिंचवडमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन
पिंपरी ः भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्यावतीने रविवारी (ता.१९ ) सायंकाळी पाच वाजता, चिंचवडमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अग्निहोत्र व सामग्री देण्यात येणार येईल. सर्वांना विनामूल्य प्रवेश असून श्री स्वामी समर्थांच्या भक्तगणांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनने केले आहे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर (श्री बाळप्पा महाराज मठ) यांच्या सहकार्याने चिंचवडगाव, श्रीमंन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिराशेजारी देऊळ मळा येथे सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी अक्कलकोट येथील गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले हे मार्गदर्शन करण्यात आहेत. तसेच आमदार शंकर जगताप, मंदार देव महाराज, डॉ. चेतनानंद ऊर्फ पंकज महाराज गावडे, डॉ. गणेश दादा शिंदे, हनुमंत गावडे उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

