वाकडमध्ये टोळक्याची 
तरुणाला बेदम मारहाण

वाकडमध्ये टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

Published on

पिंपरी, ता. १८ : टेम्पो सावकाश चालव, असे म्हटल्याच्या रागातून चौघांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना वाकडमधील छत्रपती चौक येथे घडली. याप्रकरणी प्रफुल्ल विवेक वैद्य (रा. ऐश्वर्यम ग्रीन्स, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे वाकडमधील छत्रपती चौक येथे मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या अंगावर एक टेम्पो येत असताना फिर्यादी त्या टेम्पो चालकाला टेम्पो थोडासा सावकाश चालव असे बोलले. त्यावर टेम्पोचालक ‘माझा टेम्पो आहे, मी कसा पण चालवेन’ असे रागाने बोलला. त्यानंतर टेम्पोतील तीन मुले खाली उतरली. सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. टेम्पोचालकाने कटर सारख्या हत्याराने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. तर इतर आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com