सायकल चालवा; कोंडी फोडा, प्रदूषण हटवा! ---
सकाळ वृत्तसेवा ः अमोल शित्रे
पिंपरी, ता. ८ ः स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ पाऊल टाकत आहे. प्रदुषणाबरोबरच कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना सायकलच्या माध्यमातून नाममात्र दरात सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी ‘इ झेड पेडल’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
सुरवातीच्या टप्प्यात प्रामुख्याने पिंपळे सौदागरमधील रहिवासी जवळची कामांसाठी सायकलचा वापरू शकतील. त्यासाठी कोकणे चौक ते नाशिक फाटा मेट्रो स्थानक या बीआरटी मार्गावर महापालिकेने वतीने पिंपळे सौदागर येथील ‘एंड माईल कनेक्टिव्हिटी’ साधण्यासाठी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यामुळे हिंजवडी आयटी पार्क, भोसरी तसेच चाकण येथील औद्योगिक क्षेत्र असा मोठा परिसर जोडला गेला आहे.
पहिल्या टप्प्यात तीनशे सायकल उपलब्ध आहेत. नागरिकांच्या प्रतिसादानुसार सायकलची संख्या वाढवण्यात येईल. काम करून पुन्हा त्याच स्टॅण्डमध्ये सायकल लावून नागरिक घरी परतू शकतील.
---
आकडे बोलतात
८ ः एकूण सायकल स्टँड
६ ः तयार झालेली सायकल स्टँड
१. कोकणे चौक, २. पीके चौक, ३. गोविंद चौक, ४. ८ टू १८ पार्क, ५. कल्पतरू सोसायटी, ६. नाशिक फाटा मेट्रो स्थानक
३०० ः पहिल्या टप्प्यात सायकलींची उपलब्धता
--
फायदा येथील नागरिकांना
पिंपळे सौदागर
रहाटणी
पिंपळे गुरव
नाशिक फाटा
कासारवाडी
---
शुल्क
५० पैसे प्रति मिनीट
----------
येथे जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय
१. जवळचा बाजार
२. पालिका क्षेत्रीय कार्यालय
३. दवाखाना
४. टपाल कार्यालय
५. शाळा
६. पीएमपीएल बस थांबा
७. पोलिस चौकी
---
या ५ किमी पट्ट्यात वापरा
जगताप डेअरी-शिवार चौक-कोकणे चौक-पीके चौक-विशालनगर-पिंपळे निलख-वाकड-रहाटणी-पिंपरी आदी पाच किलोमीटर अंतराच्या आत जाऊन परत येण्यासाठी सायकलचा वापर करता येईल.
--------
मेट्रो-लोकल-बससाठीही सोईस्कर
पुण्यात किंवा भोसरी, चाकण एमआयडीसी येथे जाण्यासाठी या मार्गावर सायकल वापर येईल. जवळच्या स्टॅण्डवर सायकल लावून नागरिक पुण्यापासून भोसरीपर्यंत जाऊ शकतील. लोकलप्रमाणेच मेट्रोसाठीही हा सोईस्कर पर्याय ठरेल. लोणावळ्याकडे नागरिक लोकलने जाऊ शकतील. भोसरीला पीएमपीएमएल बसमधून जाता येईल, तर शिवाजीनगर-स्वारगेटसह पुण्याला जाण्यासाठी मेट्रोचा वापर करता येईल. याशिवाय कंपनीची बसे सुटते तेथे जाण्यासाठी सायकलचा पर्याय असेल.
-----------
उपक्रमाची वैशिष्ट्ये
- ई झेड पेडल हे पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरचे स्थानिक स्टार्ट अप
- नागरिकांना मिळणार इलेक्ट्रिक बायसिकल आधारित राईडशेअर सुविधा
- युरोपियन चार्जिंग स्डँडर्डवर देशातील पहिला प्रकल्प
- मोबाईल ॲपद्वारे रोज वापरण्याची सोय
- मासिक सदस्यत्वावर वापरण्याचीही सुविधा
- पहिल्या टप्प्यात २० सार्वजनिक, ५० निवासी डॉक्सची सोय
- कोकणे चौक ते नाशिक फाटा प्रत्येक बीआरटी स्थानकाजवळ डॉक्सची सोय
- क्रमाक्रमाने डॉक्सची संख्या वाढवण्याचे नियोजन
- सायकलला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची असणार जोड
- पाच किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर सायकल आपोआप लॉक होणार
---------
सायकल संस्कृती रुजविण्याचा मार्ग
कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी सांगितले की, ‘सायकलचा वापर वाढल्यास नागरिक वाहने घरातून बाहेर काढणार नाहीत. दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर कमी झाल्यास हवेतील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाला चालना मिळेल. जवळच्या भागात एक ते दोन तास लागणाऱ्या कामासाठी नागरिक सायकल वापरू शकतील. ही संस्कृती रुजल्यास नागरिक स्वतःच्या सायकलचा अधिकाधिक वापर करतील. त्याचे चांगले फायदे भविष्यात दिसतील. संपूर्ण उपक्रमाचा खर्च कंत्राटदार स्वतः करेल. महापालिकेचा एक रुपयाही देखील खर्च होणार नाही.’
---
कोंडीवर मात्रा
महानगरपालिकेच्या बीआरटी स्थापत्य प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले की, ‘या उपक्रमामुळे नागरिक घरापासून सार्वजनिक वाहतूक सूविधेच्या ठिकाणापर्यंत आणि तेथून परतण्यासाठी पर्यावरणपूरक साधन वापरतील. वाढत्या वाहतूक कोंडीवर हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. आरोग्यदायी, स्वस्त व प्रदूषणमुक्त प्रवास करण्याचा हा योग्य मार्ग आहे. पुढील काही दिवसांत पिंपळे सौदागर ते नाशिक फाटा या मार्गावरील उपक्रम सुरु होईल. पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरवच्या काही भागातील नागरिकही याचा वापर करू शकतील.’
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.