संवाद नागरीकांचा

संवाद नागरीकांचा
Published on

स्वच्छतागृहाचा दरवाजा छोटा
भोसरी - निगडी रस्त्यावरील थरमॅक्स चौकात स्वच्छतागृह आहे. तेथे नागरिकांच्या तक्रारीनंतर दरवाजा लावण्यात आला आहे. मात्र, हा दरवाजा कशासाठी ?, कोणासाठी ? आणि कोणी लावला आहे ? हा संशोधनाचा विषय झाला आहे. या दरवाज्यातून स्वच्छतागृहात जाऊन दाखविल्यास बक्षीस देता येईल. अशी ही कामे अधिकाऱ्यांनी तपासली आहे आहेत की फक्त बिले काढून जनतेने कररुपी भरलेल्या पैशांची उधळण करायची कामे केली आहेत? वरिष्ठांनी दखल घेऊन अशा चुकीच्या कामाबद्दल दोषी व्यक्तींकडून खर्च वसुलीची कारवाई करावी.
- बी. एस. पाटील, संभाजीनगर, चिंचवड

रस्त्याची अवस्था धोकादायक
ज्योतिबा मंदिर, भालेकर चौक तळवडेपासून विकास अनाथ आश्रम, सोनवणे वस्ती, चिखलीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था खूप धोकादायक झाली आहे. कृपया, तेथे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे.
- निर्गुण थोरे, चऱ्होली


कामाच्या दर्जाचे अवलोकन हवे
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना महापालिकेकडून स्मार्ट पदपथ व रस्ते बनवत आहे. संभाजीनगर, थरमॅक्स चौक ते आकुर्डी, खंडोबा मंदिर रस्त्यावरील चेंबरच्या तुटलेले झाकणाच्या तक्रारी बऱ्याच वेळा दिलेल्या आहेत. अनेक वेळा त्याची दुरुस्ती केलेली आहे. परंतु हे वारंवार चेंबराचे वारंवार तुटणारे झाकण म्हणजे किती उच्च दर्जाच्या कामाची गुणवत्ता आहे? की निकृष्ट दर्जाची कामे चालू आहे? याचे संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी अवलोकन केले पाहिजे. अन्यथा नागरिकांनी कररुपी भरलेल्या पैशाची अशीच उधळपट्टी सुरू राहाणार आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- एस. बी. पाटील, चिंचवड

गतिरोधकाजवळील दिवा चालू करा
निगडी प्राधिकरणातील पेठ क्र.२७ मधील धन्वंतरी हॉस्पिटल येथील गतिरोधकजवळ पिवळा वाहतूक नियंत्रक दिवा बंद आहे. त्याचा कोनही बदलला आहे. त्यामुळे गतिरोधक आहे, हे समजत नाही. वाहने जोरात गतिरोधकावर आपटल्याचा आवाज येतो. रुग्णांना त्याचा त्रास होतो. तरी त्वरित दिव्याचा कोन बदलून तो चालू करावा. तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत.
- दत्ता धामणस्कर, निगडी प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com