

पिंपरी, ता. २३ ः भोसरी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी प्रस्तावित विकासकामे, शाखा विभाजन आणि उपकेंद्र उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांच्याकडे केली. महावितरण संदर्भात प्रलंबित कामांच्या पाठपुराव्यासाठी लांडगे यांनी पाठक यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी विद्युत विषयक कामांचा आढावा घेतला.
भोसरी मतदारसंघांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी उपकेंद्र उभारावे, मान्सूनपूर्वक कामांमध्ये विद्युत विषय कामांना प्राधान्य द्यावे, पावसाळ्याच्या चार महिन्यांत वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना बैठकीत केली. सक्षमपणे वीजपुरवठा करण्याबाबत आवश्यक उपाययोजना आणि प्रस्तावित कामांना गती देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. याबाबत त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याबाबतचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना संचालकांनी दिल्याचेही आमदार लांडगे यांनी सांगितले.
बैठकीच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे
- भोसरी मतदारसंघांमध्ये औद्योगिक, घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी उपकेंद्र उभारावे
- चऱ्होली व मोशी शाखा विभाजन, मोशी सफारी पार्क व प्राइड वर्ल्ड सिटी येथे अतिउच्चदाब उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करावी
- सेंच्युरी एन्का येथे अतिरिक्त दोन रोहित्र उभारणे, आरडीएसएस योजनेतील प्रस्तावित कामे मार्गी लावावे
- ३५३ कोटी ९४ लाख रुपयांच्या डीपीआर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करणे
- औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे
भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत विद्युत विषयक प्रलंबित कामांचा आढावा बैठकीत घेतला. प्राधान्याने मान्सूनपूर्व कामांना गती द्यावी. पावसाळ्यामध्ये खंडित वीज पुरवठ्याचा सामना नागरिकांना करावा लागू नये या दृष्टीने उपाययोजना करण्याचेही सूचित केले. शाखा विभाजन, उच्चदाब वीज उपकेंद्र, मनुष्यबळ निर्मितीचे विषय मार्गी लागल्यास वीजपुरवठा सक्षम होण्यास मदत होईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.
- आमदार महेश लांडगे, भोसरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.