

पिंपरी, ता. २४ ः राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतिशीलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक कार्यालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकविला.
शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणाअंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने राज्यातील २४ कार्यालयांचे भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रथम, लातूर प्रादेशिक परिवहन विभागाने द्वितीय आणि पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकविला.
‘‘पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विहित वेळेत सेवा आणि जलदगतीने तक्रारींचे निवारण केले जात असल्यामुळे नागरिकांचे कामे लवकर मार्गी लागत आहेत. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे हे यश संपादन करता आले.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.