

राहुल हातोले ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कला आणि अभिव्यक्तीच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. विशेषतः ‘व्हॉइस ओव्हर’ क्षेत्रात तरुणांचा वाढता ओढा पाहता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील संगीत अकादमीत व्हॉइस ओव्हरचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी अनेक तरूणांसोबत संवाद साधला असता त्यांनी मागणी व्यक्त केली.
सध्या युट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म, माहितीपट, ऑडिओ बुक्स आणि इ-लर्निंग अशा विविध माध्यमांत व्हॉइस ओव्हर कलाकारांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे डोरेमोन, सिंचान यासारख्या कार्टून मालिकांपासून ते विविध भाषांतील चित्रपटांचे मराठीत डबिंग करण्यापर्यंतच्या क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. व्हॉइस ओव्हर, एक नवा कलात्मक प्रवास व्हॉइस ओव्हर हे केवळ अभिनयच नाही तर आवाजाची योग्य रचना, भावना आणि संवादफेक यांचे योग्य मिश्रण आहे. या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. आवाज हे प्रत्येकाकडे असलेले अनोखे अस्त्र आहे. मात्र, त्याचा पोत आणि उच्चार सुधारून तो प्रभावी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते.
अशा आहेत विविध संधी
- कार्टून मालिकांचे मराठी डबिंग
- परदेशी चित्रपटांचे स्थानिक भाषांतील रूपांतर
- युट्यूब व वेब पोर्टलवरील व्हिडीओसाठी आवाज देणे
- ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट सादरीकरण
- शैक्षणिक ई-लर्निंग कंटेंटचे ऑडिओ तयार करणे
- सरकारी व खासगी माहितीपटांसाठी निवेदन
- एक उत्तम निवेदक
संगीत अकादमीतील अभ्यासक्रम
- सुगम संगीत
- शास्त्रीय गायन
- हार्मोनिअम वादन
- तबला वादन
आवाजाच्या दुनियेत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे ठरविले परंतु पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध नसल्याने पुण्यामध्ये जाऊन सराव करावा लागत आहे. महापालिकेने हे प्रशिक्षण शहरात सुरू केले तर विद्यार्थ्यांच्या सोईचे होईल.
- पूजा तांबे, पिंपळे-सौदागर
व्हॉइस ओव्हरसाठी मुंबई येथे उत्तम क्लासेस आहेत. तसेच पुणे शहरातदेखील नव्याने प्रशिक्षण सुरू झाले आहेत. मात्र, खर्चिक असल्याने परवडण्यासारखे नाही. म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने संगीत अकादमीमध्ये असे प्रशिक्षण सुरू करावे.
- श्रेया देशमुख, पुनावळे
शहरात तीन संभाजीनगर, चिंचवडगाव आणि निगडीमध्ये संगीत अकादमी सुरू आहेत. यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. नुकतेच गायनाचे वर्ग देखील सुरू केले आहेत. व्हॉइस ओव्हरचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार.
- पंकज पाटील, उपआयुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.