प्रगती गायकवाड हिची निवड

प्रगती गायकवाड हिची निवड
Published on

पिंपरी, ता. २५ ः व्हिएतनाम येथील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात पिंपरी चिंचवडच्या प्रगती गायकवाड हिची निवड झाली. ही स्पर्धा १८ ते २१ जूनपर्यंत चालणार आहे.
दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम (आय.जी. स्टेडियम) येथे राष्ट्रीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा झाली. त्यामध्ये प्रगती हिने ६२ किलो वजन गटात तुफानी लढती करत प्रथम क्रमांक मिळविला.
याच वजन गटामधून ती आता देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, ‘भारत केसरी’ विजय गावडे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, कार्याध्यक्ष विशाल कलाटे, उपाध्यक्ष बाबासाहेब तांबे, दिलीप बालवडकर, ज्ञानेश्वर कुटे, महाद्रंग वाघेरे, दिलीप काळे, काळुराम कवितके, संदीप नेवाळे आदींनी तिचे अभिनंदन केले.
PNE25V17086

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com