कर्ज थकविल्यामुळे जप्त केलेल्या फ्लॅटचे सील तोडले

कर्ज थकविल्यामुळे जप्त केलेल्या फ्लॅटचे सील तोडले
Published on

पिंपरी : कर्जाचे हप्ते थकविल्याने जप्त केलेल्या फ्लॅटचे सील तोडून अनधिकृतरीत्या ताबा घेतल्याचा प्रकार चिंचवडमधील शाहूनगर येथे घडला. जालिंदर राजाराम कदम (रा. शाहूनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईतील इन्फिनिटी फिनकॉर्प सोल्युशनच्या लीगल एक्झिक्युटिव्ह यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कदम याला त्‍याच्‍या फ्लॅटवर कर्ज दिले होते. मात्र, कर्जाचे हप्‍ते न फेडल्‍याने कायदेशीर प्रक्रियेने तो फ्लॅट ६ जानेवारी २०२५ रोजी कर्ज थकबाकी प्रकरणात जप्त केला होता. मात्र, आरोपीने फ्लॅटचे सील तोडून अनधिकृतरीत्या प्रवेश केला.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ करण्‍यात आली. सनी बबन शिंदे (वय २९, रा. सह्याद्री कॉलनी क्रमांक एक, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सनी शिंदे याच्‍याकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भोसरीतील सापळा रचून सनी याला ताब्यात घेत त्याच्याकडून ७९७ ग्रॅम वजनाचा ४० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भरधाव मोटारीच्या धडकेत दाम्पत्य जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. ही घटना भांबोली येथील वराळे-तळेगाव रस्त्यावरील संत तुकाराम सर्कल येथे घडली. याप्रकरणी मधुकर चिंधू भारती (वय ३९, रा. वासुली, ता. खेड, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्‍हा दाखल केला आहे. तर रोहिणी भारती आणि मधुकर भारती अशी जखमींची नावे आहेत. फिर्यादी हे त्यांच्या पत्नी रोहिणीसह दुचाकीवरून जात होते. त्‍यावेळी वराळे येथून येणाऱ्या भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली.

गांजा विक्रीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : गांजा विक्रीप्रकरणी एका तरुणाला पोलिसांच्या गुन्‍हे शाखेच्‍या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चिखली जाधववाडी परिसरात करण्‍यात आली. अभिजित लहू तुरूकमारे (वय २४, रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जाधव वाडीतील बैलगाडा घाटाजवळ आलेल्या एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती गुन्‍हे शाखेच्‍या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी तुरूकमारे याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडे ६५८ ग्रॅम वजनाचा ३२ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा सापडला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com