चिंचवडला ३१ मे, १ जूनला ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

चिंचवडला ३१ मे, १ जूनला ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’
Published on

पिंपरी, ता. २४ ः कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करियरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत ? यासारख्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का ? मग, चिंचवड एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेसमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोला जरूर भेट द्या. येथे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना वेध लागले आहेत ते महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरची दिशा ठरविण्याचे. मात्र, अशा वेळी उत्तम महाविद्यालय निवडण्यासाठी, करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. हेच लक्षात घेऊन सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. या प्रदर्शनात करिअरबाबतचे सर्व मार्गदर्शन येथे एकाच छताखाली मिळणार आहे.

या प्रदर्शनासाठी पिंपरी-चिंचवड युनिर्वसिटी हे प्रायोजक आहेत. एमआयटी एसीएस एओई हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. एकाच ठिकाणी महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायांची सर्व माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, इंटिरियर डिझाईन यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन त्यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

एक्स्पोबाबत..
केव्हा : ३१ मे आणि १ जूनला
कुठे : रागा पॅलेस, चिंचवड - एम्पायर इस्टेट
कधी : सकाळी १० ते रात्री ८
अधिक माहितीसाठी संपर्क : शिवम साळुंके - ९३०७७१५९०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com