मेफेड्रॉनप्रकरणी वडमुखवाडीत युवकाला अटक

मेफेड्रॉनप्रकरणी वडमुखवाडीत युवकाला अटक
Published on

पिंपरी, ता. २५ : मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या युवकाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा मालमत्ता विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई वडमुखवाडी येथे करण्यात आली.

समीर सलीम खान (वय २५, रा. दिघी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वडमुखवाडी येथील साईदीप लॉज जवळील मोकळ्या जागेत आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळला. पोलिसांनी आरोपीकडून मेफेड्रॉन, मोबाइल व दुचाकी असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com