मुसळधार पावसाचा फळविक्रेत्यांना फटका

मुसळधार पावसाचा फळविक्रेत्यांना फटका
Published on

रावेत, ता. २५ : मुसळधार पावसामुळे अनेक फळ विक्रेत्यांना फटका बसला असून फळांच्या मागणीत घट झाली आहे. तर दुसरीकडे पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने आंबा, टरबूज, जांभूळ, करवंदे आणि इतर उन्हाळी फळे सडली आहे. ही फळे फेकावी लागत असल्याने फळविक्रेत्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
सध्या मे महिना चालू असून उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक बदललेले वातावरण आणि पावसामुळे ग्राहकांची फळांची मागणी घटली आहे. त्याचा आंबा विक्रीला विशेष फटका बसत आहे. उन्हाळ्यामुळे बाजारात टरबूज, खरबूज, आंबे आणि पांढऱ्या-पिवळट रंगाचे पाणीदार ताडगोळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. फळ विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चौकाचौकात दुकाने थाटली. मात्र, अवकाळी मुसळधार पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्यामुळे उन्हाळी फळे सडत आहेत. टरबूज १५ ते ३० रुपये प्रतिकिलो, खरबूज ३० रुपये प्रतिकिलो, नारळ २५ रुपये, रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा ४०० ते ९०० रुपये प्रतिडझन, ताडगोळे, शहाळ्यांची १८० रुपये प्रतिडझन या दराने शहरात विक्री होत होती. मात्र आता विक्रेत्यांना प्रत्येकी २०- ५० रुपये तोटा सहन करून विक्री करावी लागत आहे.

राज्याच्या अनेक भागांतून टरबूज आणि खरबूजची आवक होत आहे. पालघर, कोकण, आंध्र प्रदेश, हैदराबाद, गुजरात, कर्नाटक येथून विविध जातींचे आंब्यांची आवक झाली होती. परंतु पावसामुळे टरबूज, खरबूज, आंबे, जांभूळ आणि करवंदे यांचे नुकसान होत आहे. वातावरणात ओलावा अधिक असल्यामुळे ही फळे सडत आहेत. परिणामी आर्थिक नुकसान होत आहे.
- सचिन भोई, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com