कल्याणी देशपांडे हिचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त

कल्याणी देशपांडे हिचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त
Published on

पिंपरी, ता. २५ : वेश्याव्यवसाय (पिटा) आणि मकोका अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या कुख्यात कल्याणी देशपांडे हिने सुरू केलेले गांजा विक्री रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकून देशपांडे हिचा पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक केली आहे. मात्र, कल्याणी देशपांडे फरार आहे. ही कारवाई बावधन येथील पाषाण - सूस रस्त्यावरील देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानात आणि राहत्या घरामध्ये करण्यात आली.

कल्याणी देशपांडे हिचा पती उमेश देशपांडे (वय ५६, रा. शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, पाषाण - सूस रोड), चुलत जावई अभिषेक रानवडे (वय ३२, रा. बालाजी निवास, शनिवार पेठ) आणि २२ वर्षीय चुलत पुतणीला अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक बावधन परिसरात गस्तीवर असताना त्यांना गांजा विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या रस्त्यावरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन नावाच्या दुकानात आणि राहत्या घरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता कल्याणी देशपांडे हिचा पती, चुलत जावई आणि पुतणी यांच्याकडे २० किलो गांजा सापडला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा, तीन मोबाइल आणि ७०० रुपये असा एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कल्याणी देशपांडे हिने काही वर्षांपूर्वी पुण्यासह देशभरात मोठे सेक्स रॅकेट चालविले होते. त्या प्रकरणात तिला शिक्षाही झाली होती. सध्या ती तुरुंगाबाहेर असून तिने गांजा विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता.

गंभीर गुन्हे दाखल
अभिषेक रानवडे याच्यावर प्राणघातक हल्ल्यासह तीन गुन्हे फरासखाना, विश्रामबाग व मार्केटयार्ड पोलिस दाखल आहेत. तर कल्याणी देशपांडे हिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःशृंगी व हवेली पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com