पिंपरी-चिंचवडमधील पाचजणांचा गौरव

पिंपरी-चिंचवडमधील पाचजणांचा गौरव
Published on

पिंपरी, ता. २५ : छावा प्रतिष्ठानतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२४-२५’ चे वितरण नवी मुंबई येथे बुधवारी (ता. २१) करण्यात आले. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांचा सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर, पुणे शहरातील अजय कांबळे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे काळुराम लांडगे, डॉ. विश्वास गजरमल, राहूल साळुंके, शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुभाष माकर यांचाही सन्मान करण्यात आला. अभिनेते संभाजी माने आणि अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार मनोज घोरपडे, वैभव नाईक, अमित गाडे पाटील, कुणाल मालुसरे, राजेंद्र मोहिते पाटील, सचिन भोसले, पोलिस अधिकारी विजय राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमित गंडाकुंश यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com