कासारसाई धरण परिसरात पावसाचा जोर

कासारसाई धरण परिसरात पावसाचा जोर

Published on

सोमाटणे, ता. २७ : कासारसाई धरण परिसरात मंगळवारी (ता.२७) पावसाचा जोर वाढला. त्यामुळे बारा तासांत ७४ मि.मी.पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदवली गेली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत कासारसाई, आढले, पुसाणे धरण परिसरात ३२३ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे दोन वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसाने पुसाणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आढले, मळवंडी, कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली. सध्या कासारसाई धरणात उपयुक्त पाणीसाठा ४.५१ दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठा ५.८३ दशलक्ष घनमीटर झाला असून धरण २८ टक्के भरले आहे.
या पावासाने पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. तर, वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे चौकात रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने येथे छोटी वाहने बंद पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
या पावसाने पवन मावळ पूर्व भागातील सोमाटणे, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, चांदखेड, आढले, कुसगाव, पाचाणे परिसरातील फुलशेती, भाजीपाला, बाजरी, भुईमुग आदी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची त्वरित पाहणी करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com