आपत्ती निवारणासाठी पीएमआरडीए सज्ज
पिंपरी, ता. २७ : सध्याच्या अतिवृष्टीसह उद्भवणाऱ्या इतर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज आहे. मात्र मुसळधार पाऊस चालू असताना आपत्कालीन परिस्थितीत घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आले.
आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत पोचविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश प्रभारी महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी यंत्रणेला दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार इतर यंत्रणांच्या संपर्कात राहून तातडीने मदत कार्य राबवावे. तसेच नागरिकांनीही शासनांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क :
पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) : ९५४५२८२९३०
मारुंजी अग्निशमन विभाग : ०२० - ६७९९२१०१, ६७९९२१००, ७०६६०५५१०१
नांदेड सिटी अग्निशमन विभाग : ०२० - ६७५२०००२, ६७५२०००१
वाघोली अग्निशमन विभाग : ०२० - २९५१८१०१, २९५१९१०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

