

पिंपरी, ता. २७ : ‘‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेसह इतर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपसांत समन्वय ठेवून नियोजन करावे,’’ असा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.
आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते. श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, श्री क्षेत्र देहू संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख वैभव महाराज मोरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अप्पा बागल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे प्रमोद कुटे, पिंपरी येथील जोग महाराज दिंडीचे जयवंत शिंदे यांच्यासह यांच्यासह महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महावितरण, देहू नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, अन्न व औषध प्रशासन, परिवहन आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालखी सोहळ्यानिमित्त महापालिका व पोलिस प्रशासन यांनी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.
देवस्थानांच्या सूचना
- पालखी मार्गांवर दिशादर्शक फलक लावावेत
- पालखी मार्गावर ठिकठिकाणी पिंक टॉयलेटची व्यवस्था करावी
- मोटार सायकल रुग्णवाहिका पालखीसोबत द्यावी
- पुरेसे स्वच्छतागृह आणि स्नानगृहे उपलब्ध करून द्यावीत
- मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून पालखी सोहळा काळात पथकांची संख्या वाढवावी
- आवश्यक ठिकाणी बॅरिकेटस् व्यवस्था करावी
- पालखी मार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षक उपाययोजना कराव्यात
- वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी
- पालखी सोहळ्याला अडथळा ठरणाऱ्या वृक्ष फांद्यांची छाटणी करावी
- पालखी मार्गावर अथवा मुक्कामाच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्यावी
- पालखी मुक्काम आणि पालखी मार्गावर स्थापत्य व विद्युत विषयक आवश्यक सर्व कामे करावीत
- पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी
- दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
- वारकरी भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी
आयुक्तांचा अधिकाऱ्यांना आदेश
पालखी सोहळ्यानिमित्त पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, पुरेशा फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था, पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवावी. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या जागी पार्किंग संदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसंदर्भातील फलक लावण्यात यावेत. पालखी मार्गावर दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत. पालखीच्या मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.