अडथळ्यांवर मात करत घरपोहोच सेवा

अडथळ्यांवर मात करत घरपोहोच सेवा

Published on

पिंपरी, ता. २९ : सततच्या पावसामुळे अनेकांच्या कामाचे गणित काहीसे कोलमडले. त्यामुळे कामात खंडही पडत आहे. असे असतानाच आपल्याला घरी दहा मिनिटांत आपण ‘ऑर्डर’ केलेले साहित्य मग ते खाद्य पदार्थ असो की जीवनावश्यक वस्तू. ती पोहोचवणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’चे काम मात्र वाढले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ग्राहकांपर्यंत आवश्यक साहित्य पोहोचविताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पावसाळी वातावरण असो, वा अन्य वेळीसुद्धा घरबसल्या दहा मिनिटांत सगळ्या गोष्टी आपल्या हातात मिळत आहेत. त्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नसते. केवळ मोबाइलवरून एक ऑर्डर द्यायची आणि त्याची तत्पर सेवा देण्यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्या तयार असतात. त्यासाठी कंपन्यांच्या कार्यालयापासून किंवा सेवा केंद्रापासून ग्राहकांपर्यंत वस्तू किंवा खाद्य पदार्थ पोहोचविण्यासाठी मुख्य भूमिका ‘डिलिव्हरी बॉय’ निभावत असतात. मात्र, पाऊस असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अडचणींची कारणे
पावसामुळे रस्त्यात पाणी साचते. अनेकदा वाहतूक कोंडी असते. त्यातून मार्ग काढत ‘डिलिव्हरी बॉय’ला ग्राहकाला निर्धारित वेळेत सेवा पुरवावी लागते. वेळेत पोहोचवणे कठीण होते. वेगात दुचाकी चालविल्यास अपघाताची शक्यता असते. पावसामुळे ग्राहकापर्यंत पोहोचण्यास उशीर होऊ शकतो.

डिलिव्हरी बॉय म्हणतात...
- बऱ्याचदा ग्राहक आम्हाला खूप प्रतीक्षा करायला लावतात. त्यामुळे आमच्याही वेळेचे गणित चुकते. पुढील ग्राहकांपर्यंत पोहोचायला उशीर होतो. तीन किलोमीटर परिसरातच डिलिव्हरी द्यायची असल्यामुळे त्रास कमी होतो, पण टेन्शन वाढते.
- पावसात वारंवार भिजल्यामुळे ‘डिलिव्हरी बॉय’च्या प्रकृतीवरही परिणाम होतो. काही कंपन्या पावसाळ्यात ‘डिलिव्हरी बॉय’ना अतिरिक्त भत्ता आणि रेनकोट देतात.
- एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे उशीर झाल्यास ग्राहकांनी समजून घ्यायला हवे. ‘डिलिव्हरी बॉय’सोबत संयमाने बोलावे. त्यांची वाट पाहून ॲपवर रेटिंग द्यावे. त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरते. दहा मिनिटांमध्ये येणाऱ्या डिलिव्हरीच्या गडबडीत पावसात फिरणाऱ्या या ‘डिलिव्हरी बॉय’चे कष्ट विसरू नये.

वेळेत डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पावसामुळे अनेकदा अडचणी येतात. काही ग्राहक समजून घेतात. पण, काही जण वेळेवर डिलिव्हरीची अपेक्षा करतात. अशावेळी डिलिव्हरी बॉयवर मानसिक ताण वाढतो.
- ऋषिकेश शेंदगे, डिलिव्हरी बॉय
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com