

पिंपरी, ता. ३१ ः ‘‘निकाल लागण्यापूर्वीच दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आवश्यक दाखले काढून घ्यावेत. त्यामुळे वेळेवर पाल्य आणि पालकांची धावपळ वाचेल. नोंदणीकृत केंद्रांवरूनच आपली दाखले काढावीत, असा सल्ला नायब तहसीलदार डॉ. मनीषा माने-लोंढे यांनी दिला.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोनिमित्त चिंचवड येथील रागा बँक्वेट हॉलमध्ये विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘प्रवेश संदर्भातील आवश्यक कागदपत्रे’ याविषयावर डॉ.लोंढे या बोलत होत्या.
डॉ.लोंढे म्हणाल्या, ‘‘मार्च महिन्यापासून आर्थिक वर्षाला सुरूवात होते. तेव्हापासून दाखले काढण्यास सुरूवात करावी. ऑनलाइन पद्धतीने सर्व दाखले मिळतात. त्यामुळे आपल्या शेजारच्या नोंदणीकृत महा ई सेवा केंद्र, सेतू, आपले सरकार अशा केंद्रांकडून दाखले काढून घ्यावेत. आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करावे, अभ्यासासह आरोग्यावर लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. करियरच्या अनेक वाटांबाबतही बोलताना अनेकदा नैराश्य येते. त्याला कसे सामोर जावे ?हे सांगताना त्यांनी ‘शर्यत अजून संपलेली नाही; कारण मी अजून जिंकलो नाही’, अशा शब्दांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता आल्याने त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.
ज्या विद्यार्थ्यांना दाखले काढण्यास कार्यालयात जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून सेवादूतांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी ‘आपले सरकार’ या नोंदणीकृत केंद्रांवरूनच दाखले घ्यावे. जातीच्या दाखल्यासाठी १२८ रूपये; तर इतर सर्व दाखल्यांसाठी केवळ ६९ रूपये घेतले जातात. अधिक पैशांची मागणी केल्यास तक्रार करावी.
- कैलास बनसोडे, अध्यक्ष, प्रदेश सीएससी व्हीएलइ असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.