पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात
Published on

पिंपरी, ता. ३१ ः शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शनिवारी (ता. ३१) उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मोरवाडी चौकातील होळकर यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करण्यासाठी राजकीय नेते, समाज बांधव आणि विविध स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली. तसेच विविध भागांत गुणवंत विद्यार्थी गौरव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महापालिका आयुक्तांकडून अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगर सदस्य शत्रुघ्न काटे, राजू दुर्गे, मारुती भापकर, अनुराधा गोरखे, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्यावतीने पुष्पहार अर्पण
श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, पंचशील संघटना, ऑल इंडिया जमात - ए - सलमानी ट्रस्ट, मराठा सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक संघटना व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ट्रस्टच्यावतीने मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई, सचिव सुरेश इंगळे, राघव होजगे, माजी सचिव सचिन दाभाडे, पंचशील संघाचे दिलीप वाघ, जमील शेख व ॲड. सुनील रानवडे उपस्थित होते.

कष्टकरी संघर्ष महासंघाकडून वंदन
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती, राज्य घरेलू कामगार समन्वय समितीतर्फे सामाजिक कार्यकर्ते यशवंत होळकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, दादा खताळ, सलीम डांगे, समाधान कदम, निरंजन लोखंडे, विजय लहाने, अनिता कदम, वंदना सावंत, अंजना भुसे, सुनंदा जाधव, लक्ष्मी कोरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने मोरवाडी चौक येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. खराळवाडीतील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष योगेश बहल तसेच शहरातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सभापती विजय लोखंडे, नगरसेवक मायला खत्री, ज्ञानेश्वर कांबळे, संजय औसरमल उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने यंदाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बारामती येथील लता भगवान करे (वय ६४) महिलेला देण्यात आला. प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पोपट हजारे यांनी सूत्रसंचालन केले. राजू दुर्गे यांनी प्रास्ताविक केले. विणा सोनवलकर यांनी आभार मानले.

ज्येष्ठ नागरिक संघ
ज्येष्ठ नागरिक संघ, मोरवाडी नाना नानी पार्क मोरवाडी येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद रुग्णालयामार्फत मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. यात आमवात , पक्षपात आदी विविध व्याधींची तपासणी करण्यात आली. बी. आर. माडगुळकर, रेणुका भोजने, दीपक भोजने उपस्थित होते.

बालाजी मंदिर स्वच्छता अभियान
भाजपकडून मोहननगर येथील बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान
तसेच अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माहिती पत्रक वाटप केले. भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, मंडल अध्यक्ष धरम वाघमारे यांनी संयोजन केले. माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, जयश्री वाघमारे, सतीश सिलम, चेतन बेदरे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे आदी उपस्थित होते.


मोरवाडी चौकात आतषबाजी
मोरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त साप्ताहिक पूजा समिती, मल्हार आर्मी शहरतर्फे मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौकात रात्री १२ वाजता आतषबाजी करण्यात आली. यावेळी गणेश एकल, सुधाकर अर्जुन, भरत महानवर, सुमेध कावळे, धनंजय गाडे, सुभाष हाके, नीरज भोजने उपस्थित होते.

अनोखे अभिवादन
दर रविवारची अखंडित साप्ताहिक पूजा समिती प्रमुख व मल्हार आर्मी शहराध्यक्ष दीपक भोजने यांनी आपल्या रक्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो काढून ३०० वी जयंतीनिमित्त आगळे वेगळे अभिवादन केले. गेल्या दहा वर्षांपासून दीपक भोजने आणि त्यांचे सहकारी होळकर स्मारकांची साफसफाई व पुतळा स्वच्छ करून दर रविवारी पुष्पहार अर्पण करत असतात. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

मोफत औषध, उपचार शिबिर
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय संत तुकारामनगर, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, ओपीडी अजमेरा यांच्यातर्फे मोफत औषध व उपचार शिबिर घेण्यात आले.

संभाजी बिग्रेडकडून अभिवादन
संभाजी ब्रिगेडच्‍यावतीने मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास शहर उपाध्यक्ष निरंजनसिंह सोखी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव मंगेश चव्हाण, संघटक उमेश जाधव, योगेश पाटील, आतिक अत्तार, गणेश देवराम, नीलेश बामणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपकडून भोसरीत स्वच्छता
भोसरी ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपद्वारे भोसरीतील संत तुकारामनगरातील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे नागरिकांना स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला. यावेळी विजय फुगे, सागर गवळी, अमोल डोळस, उमेश लोंढे, कविता भोंगाळे आदींसह नागरिकांनी सहभाग घेतला. भोसरीतील संत तुकाराम मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री शंकर महादेव मंदिर आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुनी सांगवीत चित्रकला स्पर्धा
जुनी सांगवी ः भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थांनी सहभाग घेत सुबक, सुंदर अशी चित्रे काढली. सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्हे, पारितोषिके व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी शारदा सोनवणे, जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, युवराज ढोरे, योगेश मोहारे, महेश कुलकर्णी, अमित गवळी, नीलेश सरोदे, परेश नरूटे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक विष्णू जगताप यांनी काम पाहिले. गणेश ढोरे यांनी स्पर्धेचे संचलन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
जुनी सांगवी ः येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त ट्रस्टच्या अध्यक्षा दीपाली कणसे, संजय गांधी निराधार योजना सदस्य आदिती निकम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. याचबरोबर दुर्गा माता भजनी मंडळ, मधुबन महिला सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दमयंती जगताप, मंगल झावरे, वनिता शेळकंदे, साधना थोरात, उमा चिटणीस, लता फिरके, उज्वला पाटील, आशा जगताप, स्मिता पवार, सरोज कदम, ज्योती शिंदे, सुमित्रा यादव, आभा यादव, राधा यादव यांच्या हस्ते होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सदानंद साबळे यांनी सूत्रसंचालन केले; तर देवेंद्र सिंग यादव यांनी आभार मानले.

अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन
मोशी ः येथील शिव रस्तामधील दक्षिणेश्वर हनुमान मंदिर प्रांगणात संकल्प सेवा ट्रस्टच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पूनम जाधव यांच्या हस्ते होळकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नंदकिशोर लोखंडे, विलास गायकवाड, वसंत दंडवते, संकल्प सेवा ट्रस्ट अध्यक्षा काजल गडाख पल्लवी ढवळे, सिमरन देशमुख, सुनिता भिंगे मेखाले, मनीषा दिघे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.

PNE25V18938

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com