प्रादेशिक भाषेतून उच्च शिक्षण मैलाचा दगड : डॉ. सहस्त्रबुद्धे
पिंपरी, ता.३१ ः ‘‘अभियांत्रिकी पदवीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय ‘एआयसीटी’ने २०२० मध्ये घेतला. सध्या देशातील दहा राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मराठी भाषेतून संगणकाचे (कॉम्प्युटर सायन्स) अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण देणारे ‘पीसीसीओई’ हे देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या पदवी अभ्यासक्रमादरम्यान एकही विद्यार्थी बाहेर पडला नाही, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पदवी प्राप्त ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये रोजगार संधी प्राप्त झाल्या आहेत. ‘एआयसीटी’ने प्रादेशिक भाषेतून उच्च शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे. हे त्यातून अधोरेखित होत आहे,’’ असे मत एआयसीटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी (ता. ३१) व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) प्रादेशिक भाषेतून संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ ‘अश्वमेध २०२५’ शनिवार (३१ मे) आयोजित करण्यात आला. त्यावेळी डॉ.सहस्त्रबुद्धे हे बोलत होते. पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एटीएक्सचे सीईओ अशोक गवळी, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संगणक अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख डॉ. रचना पाटील, राहुल कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी आणि पालकांबरोबरच उद्योजक प्रतिनिधी एटीएक्सचे सीईओ अशोक गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रचना पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अश्विनी वझे, डॉ. सुजाता कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजीवन भोईटे यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून अभिनंदन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी (प्रादेशिक भाषा मराठी) या विषयातील बी.टेक पदवीधर बॅचचे ‘अश्वमेघ २०२५’ मध्ये उत्तीर्ण प्रमाणपत्रे प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. मातृभाषेतून पदवीधर होणारी ही पहिलीच अभियांत्रिकी बॅच आहे. या बॅचमधील ७५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. हे जाणून आनंद झाला, असे त्यांनी नमूद केले.
अश्वमेध २०२५ काय आहे?
अश्वमेध २०२५ हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जो व्यवस्थापन आणि नेतृत्वावर लक्ष केंद्रित करतो. त्याद्वारे जागतिक स्तरावर विचारवंत, उद्योग तज्ज्ञ आणि तरुण मनांना एकत्र आणले जाते. व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे भविष्य घडवणाऱ्या विषयांवर चर्चा करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
PNE25V19034
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.