सर्वात आवडीचा विषय करियरसाठी निवडा

सर्वात आवडीचा विषय करियरसाठी निवडा
Published on

पिंपरी, ता. ३१ ः ‘‘विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत विषयांची निवड करण्याचा पर्याय नव्हता. पण, आता दहावीनंतर विषयाची निवड करण्याचा पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना दहावीपर्यंत आपल्याला आवडत असलेले विषय एका कागदावर लिहून सर्वात आवडीच्या तीन विषयांपैकी एका विषय करिअरसाठी निवडावा.’’, असा सल्ला करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वेलणकर म्हणाले,‘‘दहावीनंतर विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणासाठी शाखा निवडताना पालक बहुतांश वेळा मुलाला दहावीत मिळालेल्या टक्केवारीचा विचार करतात. पण, केवळ टक्केवारीचा विचार न करता विद्यार्थ्याला कोणत्या विषयात आवड आहे, याचाही विचार केला पाहिजे. आपल्याकडे पालक मुलाला कमी गुण असले की कला, मध्यम गुण असेल तर वाणिज्य आणि जास्त गुण असेल तर विज्ञान हा करिअर निवडण्याचा फॉर्म्युलाच ठरलेला आहे. पण, फक्त कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा निवडल्या म्हणजेच करिअर होते, असे काही नाही. या व्यतिरिक्त देखील करिअरसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आयटीआयपासून ते हॉटेल मॅनेजमेंटपर्यंत अनेक पर्याय आहेत. त्याला कोणतीही पूर्व परीक्षा द्यावी लागत नाही. केवळ मुलांना पडलेल्या गुणांवर त्यांची निवड होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन त्याला करिअर करण्याची संधी दिली पाहिजे.’’

कॉलेज निवडताना काय काळजी घ्याल ?
कॉलेज निवडताना बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र मंडळींबरोबर ग्रुप करुन कोणत्या कॉलेजमध्ये जायचे ते ठरवतात. पण, तसे न करता घराच्या तीन किलोमीटर अंतरावरीलच कॉलेज निवडावे. तसेच कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करावे, त्या कॉलेजमध्ये इंटर्नशीप पर्याय आहे का? या सर्व बाबी विचारात घेऊनच कॉलेज निवडावे.

लकी -ड्रॉ भाग्यवान विजेत्यांना बॅग, पाणी बॉटल
चिंचवड - एम्पायर इस्टेट रागा पॅलेस येथे शनिवारपासून सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो सुरू झाला आहे. या एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅग आणि पाणी बॉटल गिफ्ट दिले जात आहे. त्यासाठी लकी -ड्रॉद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. शनिवारी १६ विद्यार्थ्यांची लकी - ड्रॉद्वारे निवड केली असून या विद्यार्थ्यांना बॅग आणि पाणी बॉटल गिफ्ट दिले. अक्षरा कान्हूरकर आणि आरती पोखरकर या भाग्यवान विजेत्यांनी गिफ्ट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com