एलिट जिम्नॅस्टिक अँड फिटनेस ॲकॅडमीचे यश
पिंपरी, ता. ६ ः पिंपरी-चिंचवड डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि एलिट जिम्नॅस्टिक अँड फिटनेस ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एलिट ॲकॅडमीच्या अन्वेषा शेलार, श्रेयस भिंताडे व विहान पिरगल यांनी अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे सचिव संजय शेलार तसेच ॲकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे, प्रिया जोशी, शुभम भालेकर व लक्ष्मण नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रद्धा शेलार, लखन बगले, आयुषी वारंग व आशिष भालेकर उपस्थित होते. मुलांच्या १२ वर्षांखालील वयोगटात रुद्र राजमाने याने द्वितीय आणि सारंग एखंडे याने तृतीय तर मुलांच्या सब-ज्युनिअर वयोगटात ओम आरेने द्वितीय आणि सार्थक मांजरेने तृतीय पारितोषिक पटकावले. मुलींच्या सब-ज्युनिअर वयोगटात याशिका मते द्वितीय आणि परी वर्णेकर हीने तृतीय पारितोषिक पटकावले.