नेहरूनगर येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

नेहरूनगर येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

Published on

पिंपरी, ता. ७ : नेहरूनगर येथून वेदांत राहुल धोंडवड (वय १७) हा अल्पवयीन मुलगा मागील सात दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. वेदांत याची उंची ५ फूट ८ इंच, नाक सरळ, रंग सावळा आहे. त्याच्या उजव्या डोळ्याजवळ निशाण व हातात चांदीचे कडे आहे. तसेच अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट व पॅन्ट परिधान केलेली आहे. वेदांतबाबत माहिती मिळाल्यास संत तुकारामनगर पोलिसांशी ०२०२७४२००८० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Marathi News Esakal
www.esakal.com