सकाळ संवाद
ड्रेनेजचे झाकण निघाल्याने अपघाताची भीती
विशालनगर डीपी रस्त्यावर साई मंदिर हिंद चौकाकडे जाणाऱ्या गल्लीत चेंबरवरील झाकण निघाले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यातच खड्डा निर्माण आहे. तेथे अपघात होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल तातडीने ड्रेनेजची झाकणे बसवावीत.
- गोविंद गायकवाड, पिंपळे निलख
25V58039
मोठ्या पदपथांमुळे रस्ता अरुंद
डांगे चौकाजवळील वाकडकडे जाणाऱ्या चौकात अनावश्यक आकाराने मोठे पदपथ तयार करण्यात आले आहेत. या पादचारी मार्गामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यात वाहने बेशिस्तपणे उभी केल्यामुळे अधिकच गोंधळ वाढला आहे. अनावश्यक आणि निरुपयोगी पदपथांमुळे रस्ता धोकादायक बनला आहे.
- अशोक मोरवाल, वाकड
PNE25V58040
तुटलेली फांदी महिनाभरापासून रस्त्यावरच
मोशी सेक्टर नंबर ११ परिसरातील मुख्य रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून फांदी पडलेली आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहने आणि पादचाऱ्यांची दिवसरात्र वर्दळ असते. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पण, प्रशासनाने अजूनही काही कार्यवाही केलेली नाही. ही फांदी हटवून रस्ता स्वच्छ व सुरक्षित करण्यात यावा.
- निर्गुण थोरे, इंद्रायणीनगर
E25V58041
काळेवाडीत खड्डे; डांबरीकरणही अर्धवट
काळेवाडी येथील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण अर्धवट आहे. त्यावरील खडी विखुरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वाहने घसरत आहेत. ‘पाऊस थांबताच तातडीने डांबरीकरण करणार आहोत,’ असे अधिकारी सांगत होते. पण, त्यांनी अजूनही रस्ते दुरुस्ती सुरू केलेली नाही. या परिसरात तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.
-प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
25V58038
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.