दीपज्योत उजळविण्यात विशेष मुलांशी ‘झेप’
आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ ः वाट्याला आलेल्या जीवनास दोष न देता, जिद्दीच्या बळावर आपल्या चिमुकल्या हातातून साकारलेल्या दहा हजार सौंदर्यपूर्ण पणत्यांमध्ये यंदाच्या दीपावलीत दीपज्योती उजळणार आहेत. या सुखद भावनेनेच पिंपरीतील झेप पुनर्वसन केंद्रातील ‘विशेष’ मुले भारावून गेली आहेत. दिवाळी साहित्य बनविण्यात त्यांनी ‘झेप’ घेतल्याचे पाहायला मिळाले. हे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असून स्वावलंबी जीवनाचे धडेही ते गिरवत आहेत.
झेप पुनर्वसन केंद्रात विशेष (गतिमंद) मुलांना दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्या बनविणे, आकाश कंदील करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पाठबळ मिळत आहे. यातून आर्थिक हातभार लावण्याची मानसिकताही विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. ‘विशेष’ मुले आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यांना विशेष शिक्षण देणे, त्यांना योग्य थेरपी देणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे, आई-वडिलांच्या पश्चात किंवा हयातीत त्यांची उत्तम प्रकारे देखभाल करणे, ही काळाची गरज ओळखून झेप पुनर्वसन संस्थेने मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. १२० विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत.
दृष्टिक्षेप...
- ‘सीएसआर’अंर्तगत शहरातील विविध कंपन्या आणि शाळांच्या ठिकाणी स्टॉल लावणार
- व्यावसायिक प्रशिक्षणातून संस्थेतील चार मुले मानधन घेऊन स्वत:च्या पायावर उभे
- तब्बल १० हजार पणत्या आणि १०० आकाश कंदील मुलांनी तयार केले आहेत
विशेष मुलांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण दडलेले असतात. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कलेला वाव देण्याचे काम झेपच्या माध्यमातून करीत आहोत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी कराव्यात, या संस्थेच्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे.
- नेत्रा तेंडुलकर, संस्थापिका, झेप पुनर्वसन केंद्र
---
(५८९४९, ५८९५०)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.