भक्ती-शक्तिगीतांच्या मैफिलीत भाविक तल्लीन

भक्ती-शक्तिगीतांच्या मैफिलीत भाविक तल्लीन
Published on

पिंपरी, ता. २८ : ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या भक्तिगीतापासून ते ‘शिवबा राजं...’ , ‘युगत मांडली..’ अशा भारुडाच्या सादरीकरणाने रसिक तल्लीन झाले. निमित्त होते, चिंचवडगाव येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळच्या वतीने आयोजित करण्याच आलेल्या श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे.
पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा प्रारंभ गायक, संगीतकार अवधूत गांधी आणि सहकारी यांनी भक्ती-शक्तिगीतांच्या मैफिलीने झाला. बुकॉऊ वुल्फ कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगणात पार पडलेल्या या मैफिलीला माजी नगरसेवक मधू जोशी, सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे-पाटील, दीपक टाव्हरे, संजय आधवडे, गणपती फुलारी, मीनल देशपांडे, शंकर बुचडे, नितीन चिंचवडे -पाटील, माधव कुलकर्णी व हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र...’ या भक्तिरचनेने व ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या जयघोषात मैफिलीचा प्रारंभ झाला. संत एकनाथ महाराजांच्या ‘कैसी समचरणी ती शोभा...’ या रचनेने रसिकांना भक्तिरसाची अनुभूती केली. ‘श्रीमंत युगाची शिवराय मूर्ती ’, ‘जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही’ या गीतांना श्रोत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामगजर करीत साथ दिली. तुकोबांच्या ‘हेचि येळ देवा...’ ‘चाकर शिवबाचं...’, ‘युगत मांडली ’ या गीतांना श्रोत्यांनी गायनसाथ केली. मैफलीचा समारोप ‘स्वामींचे हे देणे...’ भैरवीने करण्यात आला. अभय नलगे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), राजेंद्र बघे (मृदंग), प्रसाद भांडवलकर, हेमंत क्षीरसागर आणि विजय सोनवणे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कोळी यांना मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कैलास गावडे यांनी सूत्रसंचालन; कैलास भैरट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com